नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस शहरभर गस्तीवर असतात. लोकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असलेल्या पोलिसांपासूनच जेव्हा धोका निर्माण होते, तेव्हा ही बाब चिंतादायक असते. असाच काहीसा प्रकार आता समोर आलाय. दरम्यान सोशल मीडियामुळे या अशा गोष्टी आता सहज समोर येऊ लागल्या आहेत. अनेक गोष्टींसाठी काहीजण सोशल मीडियाचा अत्यंत योग्यपणे वापर करत आहेत. तसंच अनेकांना न्यायही मिळत आहे, असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा ‘रक्षक’च ‘भक्षक’ होतात

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पोलीस कर्मचारी एका शाळकरी मुलीचा गाडीवरुन पाठलाग करत होता. मुलगी शाळा सुटल्यानंतर सायकलवरुन घरी जात असताना, पोलीस कर्मचारी दुचाकीवरुन तिच्या बाजूने चालला होता. दरम्यान यावेळी मागून गाडीवरुन प्रवास करणाऱ्या एका महिलेने कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. पोलीस कर्मचारी शाळकरी मुलीची छेड काढत असल्याचं पाहिल्यानंतर महिला त्याला रोखते. यावेळी महिला आणि आणखी एक व्यक्ती पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारतात. तू मुलीचा पाठलाग का करत आहेस? अशी विचारणा ते त्या पोलीस कर्मचाऱ्याला करतात. यावर पोलीस कर्मचारी ही आपल्या मुलीची वर्गमैत्रीण असल्याचा दावा करतो.

तसंच स्कूटरवर नंबर प्लेट का नाही आहे अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी उत्तर देतो की, इलेक्ट्रिक गाडी असल्याने तिच्यावर नंबर प्लेट नाही. महिलेने हा पोलीस कर्मचारी रोज मुलींची छेड काढत असल्याचा दावा केला आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: चक्क चिमुकलीच्या हातात बिडी; थांबवायचं सोडून घरचे काढत होते व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत उत्तर प्रदेशमध्ये हेड कॉन्स्टेबलचं निलंबन झालं आहे. त्याच्यावर शाळकरी मुलीला त्रास देण्याचा आरोप आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video viral police head constable harasses schoolgirl gets suspended srk