हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्यांची सुरुवात होते. तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात आहे. दरवर्षी हा सण १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. यंदाची मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. संक्रातीदिवशी लोक एकमेकांना तिळगूळ देतात आणि तिळगूळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
संक्रातीदिवशी जुने रूसवे फुगवे, वाद सोडून एकमेकांचे तोंड गोड करून पुन्हा नव्याने सुरुवात करावी असे मानले जाते. हाच गोडवा नवरा बायोकोच्या नात्यातही पाहायला मिळावा अशी अनेक विवाहित पुरुषांची अपेक्षा असते पण पती पत्नीच्या नात्यात थोडी भांडणे, थोडा रुसवा-फुगवा तर असतोच पण, बायकोला तिळगूळ घेऊन तिच्याकडून गोड बोलण्याची अपेक्षा करणाऱ्या नवऱ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या एका पोस्टरची सर्वत्र चर्चा होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ इंस्टाग्रामवर_sahil_0919 या अकांऊटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये भररस्त्यात एक पोस्टर घेऊन उभा आहे. पोस्टरकडे येणारे जाणारे लोक वळून वळून पाहात आहे. अनेकांना पोस्टर पाहून हसू आवरत नाहीये. विशेषत: विवाहित महिला आणि पुरुषांना हे पोस्टर पाहून हसू येत आहे. व्हिडीओच्या शेवटी पोस्टरवरील मजकूर दिसतो ज्यावर लिहिले आहे की, “बायकोला तिळगूळ देणे ही श्रद्धा आहे आणि ती गोड-गोड बोलेल ही अंधश्रद्धा आहे.”
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कडू सत्य”
पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओवर विविध कमेंट दिल्या आहेत.
एकाने कमेंट केली की, भाऊ चुकला तू! बायोकोचे गोड बोलणे ऐकण्यासाठी तिळगूळ नाही दिलं तरी चालेल फक्त तिच्या मनासारखं वागावे लागते.”
दुसऱ्याने म्हटले, एवढी हिंमत येते कुठून?
तिसऱ्याने कमेंट केली की,
तिसरा म्हणाला, “भावा एवढं खरं नव्हतं” बोलायचं”
चौथा म्हणाला , “भाऊ खूप साऱ्या दुखी चेहऱ्यांवर स्मित हास्य आणतोय तू”
हेही वाचा – साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
पाचव्याने कमेंट केली की,”तिळगुळ देणं ही आपली संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे, पण त्यातून बायको गोड बोलेल अशी अपेक्षा ठेवणं हे खऱ्या अर्थाने विनोदी अंधश्रद्धा वाटू शकते. कधी कधी परंपरा आणि विश्वास यामधली सीमारेषा हास्यकारक पद्धतीने दिसून येते!”