Accident video: भारतीय रेल्वे दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाते. मात्र ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. धावत्या ट्रेनमध्ये चढणं किंवा उतरणं अनेकदा जीवघेणं ठरतं. सध्या सोशल मीडियावर अशी प्रकरणं समोर येतात, ज्यामध्ये लोक चालत्या ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना अपघाताला बळी पडलेले दिसतात. धावती ट्रेन पकडणं किंवा धावत्या ट्रेनमधून उतरणं हे प्रवाशांच्या जिवाला धोकादायक आहे ही सूचना आतापर्यंत आपण अनेकदा ऐकली असेल. रेल्वे प्रशासन वारंवार असे प्रकार करण्यापासून प्रवाशांना रोखत असतं. अनेकदा धावती ट्रेन पकडण्याच्या किंवा धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशीच एक घटना सध्या उत्तर प्रदेशमधून समोर येत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक ट्रेन प्रचंड वेगाने स्थानकातून नॉन स्टॉप धावत आहे. त्यानंतर अचानक एक तरूण ट्रेनमधून अचानक पडताना दिसत आहे. या ट्रेनच्या प्रचंड वेगाने हा तरूण फलाटावरून अक्षरश: फरफरटत जाताना दिसत आहे. त्याला घसरत जाताना पाहून काळजाचा थरकाप होतो. हा ट्रेन जवळ जवळ ११० किमी वेगाने धावत होती, मात्र दैव बलवत्तर म्हणून या तरुणाला यामध्ये काहीही दुखापत झाली नाही. युपीच्या शाहजहापूर मधील ११० किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून एक युवक पडला आणि फलाटावर घसरत गेला आणि पुन्हा उभा राहीला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – चालत्या बाइकवर कपलचा रोमान्स, सोशल मीडियावर Video Viral
या अपघाताच्या निमीत्ताने धावत्या ट्रेनमधून उतरणे किंवा धावती ट्रेन पकडणे असे प्रकार प्रवाशांनी टाळावेत असं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलं आहे.