Wanindu Hasaranga: भाऊ आणि बहिणीचे नाते किती खास असते हे आपल्याला माहितच आहे. बहिण भाऊ एकमेकांसाठी जीव देतील, पण जेवताना उठून एक ग्लास पाणी मात्र कधीच देणार नाहीत. असं असलं तरी बहिणीच्या मागे कायम आधार म्हणून उभा असलेला आणि कोणत्याही प्रसंगात तिची काळजी घेणाऱ्या भावाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बहिणही प्रत्येक टप्प्यावर तिच्या भावासाठी वेगवेगळ्या गोष्टींचे त्याग करत असते. लहानपणी एकमेकांशी भांडणारे आणि दंगा-मस्ती करणारे हेच बहिण भाऊ मोठेपणी मात्र एकमेकांचे छान मित्रमैत्रीण होतात आणि एकमेकांना चांगल्या-वाईट प्रसंगात चांगली साथही देतात. मात्र हीच बहिण काही वर्षांनी सासरी जाते तेव्हा मात्र भाऊ खचून जातो. याचाच प्रत्येय देणारा वनिंदू हसरंगाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
धाय मोकलून रडला वनिंदू हसरंगा
श्रीलंकेचा स्टार क्रिकेटपटू वानिंदू हसरंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हसरंगाला छातू डी सिल्वा ही लहान सख्खी बहीण आहे. तिचे नुकतेच लग्न झाले. या व्हिडिओत वानिंदू हसरंगा भावूक झालेला दिसतोय. आपल्या नेतृत्वाखााली श्रीलंकेाल प्रीमिअर लीग जिंकून देणाऱ्या वानिंदू हसरंगाचा इमोशन व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. बहिण-भावाच्या अतुट नात्याचा हा क्षण पाहून सर्वच जण भावूक झालेत. बहिणीच्या पाठवणीच्यावेळी हसरंगाला अश्रू आवरणं कठिण झालं आणि सर्वांसमोरच तो धायमोकलून रडू लागला. त्याच्या बहिणींनेही यावेळी त्याला मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – CCTV VIDEO: संतापजनक! आधी ओव्हरटेक नंतर डॉक्टरला थेट कारच्या बोनेटवर नेले फरफटत
या भावा-बहिणीच्या व्हिडिओने अनेक क्रिकेट चाहत्यांनाही भावूक केले आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी विविध प्रतिक्रियाही या व्हिडिओवर दिल्या आहेत. तसेच “बहिणीच्या लग्नात हसरंगाचं निराळं रुप दिसलं” अशा प्रतिक्रिया नेटकरी व्हिडीओवर करत आहेत.