आजकाल प्रसिद्धीसाठी लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ, स्टंट करत असतात. तरुणाईला तर या गोष्टींची जास्त क्रेझ असलेली पहायला मिळते. दिवसभरात अनेक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने मेकअप करताना एवढं धाडसी कृत्य केलंय की कुणी विचारही केला नसेल. सोशल मीडियावर मेकअपच्या शौकीन लोकांची कमी नाही. अनेकदा असे लोक इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मेकअपचे व्हिडिओ शेअर करत राहतात.

McKenna नावाची तरुणी या व्हिडिओमध्ये हवेत मेकअप करताना दिसत आहे. ही तरुणी पॅराग्लायडींग करत मेकअप करत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर, १८ हजार लोकांपेक्षा अधिकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर या व्हिडिओवर कमेंट्सचा देखील वर्षाव होत आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
people perform Rangoli Art showcasing Indian culture in America
अमेरिकेत तरुणांनी काढली भारतीय संस्कृती दर्शवणारी रांगोळी; लोक पाहतच राहिले, VIDEO होतोय व्हायरल
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही
group of women amazing dance on famous song Dilat Zapuk Zupuk vajta rahtay
“दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच

स्काई डाइविंग करत केला मेकअप

तुमची स्किन केअर रूटीन काय आहे? असं म्हणत McKenna नावाने १० हजार फूट उंचीवरुन मेकअप करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मॅकेन्ना मेकअपच्या सर्व स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. स्काई डाइविंग करताना वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. मॅकेन्ना प्रथम जोरदार वार्‍यामध्ये चेहऱ्यावर क्लिंझर लावते. यानंतर ती बाटलीच्या पाण्याने कपडा ओला करून चेहरा स्वच्छ करते. यानंतर ती चेहऱ्यावर प्राइमर लावते. यानंतर शेवटी ती फाउंडेशन लावून बेस सेट करते. १० ते १५ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – बॉयफ्रेंडबरोबर चॅट करताना नवऱ्याने बायकोला रंगेहात पकडलं, हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर, १८ हजार लोकांपेक्षा अधिकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर या व्हिडिओवर कमेंट्सचा देखील वर्षाव होत आहे.