सुरक्षा रक्षकांवर हल्ले नेहमीच होत असतात. उच्चशिक्षीत लोक आपल्याकडे असणाऱ्या ताकदीचा गैरवापर करत असल्याच्या बऱ्याच घटना आपण याआधीही पाहिल्या आहेत. काही लोक आपलं कर्तव्य बजावत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर नेहमीच आरेरावी करत गैरवर्तन करत असतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही लोक हे विसरुन वागत असतात. असाच एक संतापजनक प्रकार गोव्यात घडला आहे. एका महिलेच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हीही या जोडप्याचा निषेध कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमका काय घडला प्रकार –

गोव्यात फिरायला आलेल्या पर्यटक जोडप्यानं ओल्ड गोवा येथील प्रसिद्ध ‘द बॅसिलिका ऑफ बॉम जीसस’ या चर्चमध्ये प्रवेश न दिल्यानं चांगलाच गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय. चर्च बंद झाल्यानंतरही हे जोडपं चर्चमध्ये जाण्यासाठी परवानगी मागत होते. चर्च बंद होण्याची वेळ झाल्यामुळे चर्च बंद करण्यात आलं होतं, हे वारंवार समजवूनही हे जोडपं सुरक्षा रक्षकांचं एकत नाही. दरम्यान या व्हिडीओमधील महिलेनं उलट सुरक्षा रक्षकावर चप्पलनं हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय. तर तिच्यासोबतचा पुरुष मोठ मोठ्यानं सुरक्षा रक्षकावर ओरडत आहे. यावेळी आजुबाजूला असणारे लोकही या जोडप्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे जोडपं कोणाचही ऐकायला तयार नाही. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनीही यामध्ये हस्तक्षेप करत जोडप्याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.

पाहा व्हिडीओ –

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या जोडप्याच्या गैरवर्तणुकीवर नेटकरी संतापले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान सुरक्षा रक्षकाला चप्पलने मारल्याच्या आरोपाखाली या महिलेवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही बेजबाबदार वर्तन खपवून घेतले जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.