कुछ हटके करना है, असं म्हणत बरेच जण वेगवेगळे स्टंट करत असतात. मात्र हे स्टंट आपल्या अंगलट येऊ शकतात याचा आपल्याला विसर पडतो. झोका घ्यायला प्रत्येकाला आवडतो त्यात जमिनीपासून हजारो फूट उंचीवर झोपाळ्यावर झोके घेणे खूपच रोमांचक असू शकते, परंतु हे असे करत असताना आपली एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. याचेच एक ताजे उदाहरण देणारा एक रशियाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हिडीओतील महिला झोके घेत असताना झोपाळ्याची साखळी अचानक तुटली, ज्यामुळे महिला झोपाळ्यावरुन खाली पडल्या. ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
नेमकं काय घडलं –
या व्हिडीओमध्ये दोन महिला झोपाळ्यावर झोके घेत आहेत, मागे उभा असलेला माणूस त्यांना पाठून झोका देताना दिसत आहे. या महिला 6300 फूट उंच खडकाच्या काठावर असलेल्या झोपाळ्यावरुन झोका घेत आहेत. तेवढ्यात झोपाळ्याची साखळी तुटते आणि झोका घेणाऱ्या दोन्ही महिला खाली पडतात. नशीब बलवत्तर म्हणून या महिला यातून वाचल्या असून किरकोळ जखमी झाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – महिलेनं कुत्र्याच्या पिल्लांना खाऊ घातलं, नंतर कुत्र्यानं असं काही केलं की…;Viral Video पाहून व्हाल चकीत
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सुरक्षेमध्ये एवढी मोठी चूक कशी झाली याचा शोध सुरू केला आहे. रशिया रिपब्लिक ऑफ दास्तानमधील शुल्क कॅनियन येथील ही घटना असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखाहून अधिक व्हयूज मिळाले आहेत.