Virat Kohli Rangoli Video On Water: २००८ मध्ये क्रिकेट विश्वात पदार्पण केलेल्या विराट कोहलीने मागील १६ वर्षात मैदानातसह चाहत्यांच्या संख्येचे ही अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. सोशल मीडियावर कोहलीच्या फॉलोवर्सची संख्या पाहून त्याला ऑनलाईन किती प्रेम मिळतं हे आपण पाहतोच पण प्रत्यक्षात सुद्धा कोहलीचं आपल्याकडे लक्ष जावं म्हणून चाहते वेगवेगळे फंडे वापरून पाहत असतात. अलीकडेच आयपीएलच्या एका सामन्यात तर एक कोहली प्रेमी चाहता चक्क मैदानात धावत जाऊन कोहलीच्या पाया पडला होता. आता सुद्धा विराटच्या एका चाहतीची ऑनलाईन चर्चा होतेय. पण एक आनंदाची बाब म्हणजे फक्त विराटची चाहती म्हणून नव्हे तर या तरुणीच्या कमाल टॅलेंटची सुद्धा नेटकरी वाह्ह वाह्ह करत आहेत. नेमकं असं तिने काय वेगळं केलंय, चला पाहूया..
@dhrisha_suroiwal या इंस्टाग्राम युजरने आपल्या ऑनलाईन फॉलोवर्ससह हा व्हिडीओ शेअर करताच काहीच दिवसात तो प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये ही तरुणी चक्क पाण्यावर विराट कोहलीची अप्रतिम रांगोळी रेखाटताना दिसत आहे. अलीकडे अनेक कलाकार आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे फोटो, चित्र, रांगोळ्या काढून प्रसिद्ध होतात पण या व्हिडिओमध्ये विराटच्या चेहऱ्याचा प्रत्येक बारकावा इतका अचूक टिपलाय की त्याचं कौतुक करायलाच हवं. एका साध्या परातीत पाणी घेऊन त्यावर पिवळ्या रांगोळीचा बेस बनवून वर विराटचा चेहरा या तरुणीने रेखाटला आहे.
Video : विराट कोहलीची पाण्यावरील सुंदर रांगोळी
हे ही वाचा<< मुंबई लोकलच्या गर्दीत कुत्र्याने बसायला अशी जागा मिळवली की बघून म्हणाल वाह्ह; ट्रेनमध्ये उतरताना चक्क..
हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर अनेकांनी कमेंटमध्ये विराट अनुष्काला टॅग केलं आहे. अनेकांनी या तरुणीच्या टॅलेंटचं कौतुक करत,”साधी रांगोळी सुद्धा इतकी परफेक्ट काढणं शक्य होत नाही तू तर पाण्यावर एवढं नाजूक काम केलं आहेस, तुला सलामच!” अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. @dhrisha_suroiwal च्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त विराटच नव्हे तर अन्यही अनेक कलाकार मंडळी व आध्यात्मिक गुरूंच्या रांगोळ्या पाहायला मिळतात. याच कलेच्या बळावर तिने जवळपास ९८ हजाराहून अधिक सबस्क्राइबर्स मिळवले आहेत. तुम्हाला विराट कोहलीची ही रांगोळी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा.