Virat Kohli- Anushka Sharma Video: IPL 2023 सुरु असताना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मौजमजेचे, मैदानातील गोड क्षणांचे अनेक व्हिडीओ फोटो सध्या व्हायरल होत आहेत. आज अनुष्का शर्माच्या वाढदिवशी किंग कोहलीने अनुष्काला शुभेच्छा देत तिचे फोटो शेअर केले आहेत. विराट जितका खेळकर आहे तितकाच त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कठोरही आहे. अनेकदा चाहते प्रेमाच्या नादात बेभान होऊन सेलिब्रिटींना त्रास देतात, असाच काहीसा प्रकार अलीकडे विराट- अनुष्काच्या बाबत घडला. यावेळी विराटने चाहत्यांना समज देताना चिडून केलेली एक कृती सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरसीबीच्या सामन्यांच्या निमित्ताने विराट कोहली बंगळुरुमध्ये असताना तो अनुष्कासह एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गेला होते. बंगळुरुतल्या प्रसिद्ध CTR उपहारगृहात दोघांनी मसाला डोसासह इतर पदार्थांवर ताव मारला. यावेळी दोघे CTR मध्ये असल्याची बातमी पसरली. आणि मग सेल्फीसाठी दोघांच्या चाहत्यांची झुंबड उडाली. आधी दोघांनी फॅन्सना नाराज न करता काही फोटो काढले पण नंतर विराट, अनुष्काच्या भोवती गर्दी वाढत गेली.

यावेळी विराट अनुष्काला गर्दीतून बाहेर नेण्यासाठी चांगलीच कसरत करताना दिसत आहे. पण या गर्दीत एक चाहता कदाचित चुकून अनुष्काच्या अत्यंत जवळ येऊ लागला हे पाहताच विराटने भडकून त्या चाहत्याला दूर होण्यास सांगितले. विराटचा पारा चढलेला अवतार सध्या व्हायरल होत आहे.

Video: अनुष्कासाठी विराट चाहत्यांशी भिडला

हे ही वाचा<< ७०० रुपये लिटर पाणी पिणाऱ्या विराट कोहलीने शिळ्या जेवणाचा धरला हट्ट; 5 स्टारचा शेफ म्हणाला, “BCCI ने कठोर..”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी सुद्धा विराटच्या कृतीचे समर्थन केले आहे. चाहत्यांचे प्रेम त्यांच्या जागी पण निदान सेलिब्रिटींची पर्सनल स्पेस जपायला हवी. विराटने तरी खूप शांतपणे परिस्थिती हाताळली पण चाहत्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवे. अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video virat kohli got so angry at fan for coming too close to anushka sharma clip goes viral with netiznes calling bhabhiji svs