IND vs PAK Virat Kohli: चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रविवारी (२३ मार्च) भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारत पाकिस्तान सामना पाहायला प्रत्येक भारतीयाला आवडतं आणि जर भारत जिंकला तर सगळीकडे जल्लोष साजरा केला जातो. कालपासून सगळीकडे एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. गावात शहरात तसेच सोशल मीडियावर लोक भारतीय खेळाडूंचे कौतुक करत आनंद उत्सव साजरा करताना दिसत आहे. (Virat Kohli’s Sportsmanship : Video)

दुबई येथे झालेल्या या बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीची सगळीकडे चर्चा होत आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावलं आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला. यासह त्याने स्वत:चं शतकही पूर्ण केलं.

सध्या सोशल मीडियावर विराटच्या स्‍पोर्ट्समॅनशिपचे कौतुक केले जात आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की विराटने असे काही केले की त्याच्या कृतीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.

व्हायरल व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिसेल की नॉन-स्ट्राइकरवर एन्डवर पाकिस्तानी फलंदाज नसीम शाह उभा होता. तितक्याच्या त्याच्या शूजची लेस निघते तेव्हा तो कोहलीला आपल्या शूजची लेस बांधण्यासाठी मदत मागतो तेव्हा विराट क्षणाचाही विचार न करता २२ वर्षाच्या नसीमच्या शूजची लेस बांधतो. त्याच्या या कृतीने सर्वांचे मन जिंकले आहे आणि सोशल मीडियावर लोक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

minirolling_26 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”याच कारणामुळे विराटवर सर्व जण प्रेम करतात.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”शून्य टक्के अहंकार, शंभर टक्के कामगिरी” तर एका युजरने लिहिलेय, “ना देश, ना धर्म, खिलाडूवृत्ती” आणखी एका युजरने लिहिलेय,”एक पाकिस्तानी म्हणून माझं कोहलीवर खूप प्रेम आहे” एक युजर लिहितो, “कोहली हा एक चांगला खेळाडूच नाही तर एक चांगली व्यक्ती सुद्धा आहे.” तर एक युजर लिहितो, “हाच चांगुलपणा आहे जो खेळाडूला मोठा बनवतो” एका युजरने लिहिलेय, “”एकच मन कितीदा जिंकणार” अनेक युजर्सनी विराटच्या या कृतीचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader