सोशल मीडियावर, एखाद्या गाण्यावर प्राणी प्रतिक्रिया देत असतानाचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एखादा कुत्रा कधी गाण्यावर नाचताना दिसतो, तर कधी एखादे मांजर अगदी मन लावून तिचे आवडते गाणे ऐकत असल्याचे आपण पाहिले आहे. अशातच सध्या एका मजेशीर व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. कारण – या व्हिडीओमधील कुत्रा चक्क अर्जित सिंगचे, ‘तुझे कितना चाहने लगे हम’ गाणे लागताच त्या गाण्यासोबत गाताना दिसतो आहे.

“पाळीव कुत्र्याच्या कानावर जेव्हा त्याचे आवडते गाणे ‘दिल का दारिया’ हे पडते, तेव्हा त्याची अशी प्रतिक्रिया असते”, असे कॅप्शन लिहित @sachkadwahai या अकाउंटने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला, कुत्रा एका सोफ्यावर आराम करताना दिसत आहे. एक दोन गाण्यांनंतर, जसे त्याचे आवडते गाणे टीव्हीवर लागते, तसा तो ताडकन गाणे गाण्यास सुरुवात करतो, असे पाहायला मिळते.

actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
schools, America, mobile phones,
विश्लेषण : विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेत शाळा आग्रही का? काही राज्ये कायदा करणार?
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
Vinesh Phogat opinion about the development of wrestling sport news
महिला कुस्तीपटू घडविल्यास अधिक आनंद; कुस्तीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा विनेशचा मनोदय
ITR Refund Scam
ITR refund scam: करदात्यांनो रिफंडबाबत मेसेज, ईमेल येत आहेत? नव्या स्कॅमपासून सावधान!
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?

हेही वाचा : अरे देवा! विचित्र पदार्थांमध्ये अजून एकाची भर… सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सफरचंद इडलीचा व्हिडीओ पाहिलात का?

या व्हिडीओला आजवर तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात कमेंट्सदेखील केलेल्या आहेत. यामधील काही प्रतिक्रिया पाहा.

एकाने, “कदाचित त्याचा नुकताच ब्रेकअप झाला असेल” अशी मिश्कील कमेंट केली.
दुसऱ्याने, “मी सुद्धा अगदी असाच गातो, हा हा हा” असे आपल्या गाण्याबद्दल सांगितले. तिसऱ्याने, “आई गं… किती गोड गातोय तो कुत्रा… फारच छान”, असे लिहिले आहे.
चौथ्याने, “त्याला कुणाची तरी आठवण येत आहे, म्हणून तो हे गाणे बदलायला सांगतोय…” अशी प्रतिक्रिया दिली.


तर शेवटी पाचव्याने, “हे कमेंट सेक्शन फारच मजेशीर आहे”, असे सर्व नेटकऱ्यांचे कौतुक करणारी कमेंट केलेली आहे.