Viral video: मुलं देवाघरची फुलं, असं आपण नेहमी म्हणतो. कारण- ती नेहमी खरं बोलतात. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लहान मुलांचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. त्यांचा निरागसपणा सगळ्यांनाच भावतो. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. सगळीच लहान मुलं अभ्यास न करण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करीत असतात. मात्र, या चिमुकलीनं अभ्यास न करण्याचं असं कारण सांगितलं की, ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर कायमच लहान मुलांचे फनी व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्यातील निरागसता आपण कायमच अनुभवत असतो. सध्या अशाच एका चिमुकलीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. अभ्यास न करणाऱ्या मुलीला शिक्षिकेनं अभ्यासाकडे तू का दुर्लक्ष करतेस, असं विचारलं असता, तिनं जे काही उत्तर दिलंय ते ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

अभ्यास न करण्याचं भन्नाट कारण

व्हिडीओमध्ये शिक्षक लहान मुलीला, “तू तुझ्या अभ्यासात गंभीर का नाहीस, का अभ्यास करीत नाहीस?” त्यावर मुलगी म्हणते, “पृथ्वी सुमारे ४५० कोटी वर्षांपासून आहे आणि मानव ३७० कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे.” त्यानंतर तिनं असंख्य ब्रह्मांडं आणि आकाशगंगांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आणि पृथ्वीवर २०० पेक्षा जास्त देश असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर ती पुढे सांगते, “या एवढ्या मोठ्या विशाल विश्वात, मी फक्त एक ट्रिलियन प्रजातींपैकी एक आहे आणि भारतातील प्रचंड लोकसंख्येचा भाग आहे.” एवढं सगळं बोलल्यानंतर शेवटी ती शिक्षिकेलाच, “आता सांगा माझ्या असण्यानं असा काय फरक पडणारे”, असा प्रश्न विचारते. विद्यार्थिनीचं हे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल; मात्र दुसरीकडे तिची स्मरणशक्तीही वाखाणण्याजोगी असंल्याचं लक्षात आल्यावर तुमच्या तोंडून नकळत कौतुकोद्गारही निघतील यात शंका नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाय घसरून तरुणी थेट दरीत कोसळली; VIDEO पाहून थरकाप उडेल

नेटकरी काय म्हणतात?

यावर आता नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं आश्चर्य व्यक्त करीत म्हटलं, “मुलगी किती हुशार आहे.” तर दुसऱ्यानं, “तिला ग्रह आणि आकाशगंगांबद्दल खूप माहिती आहे. यातून हे दिसतंय की, मुलीचा अभ्यास आहे आणि ती खरोखर हुशार आहे”, असं म्हटलंय. “मनाला भिडणारं इतकं खरं विश्लेषण. आपली शिक्षणपद्धती बदलावी लागेल. इतक्या लहान वयात आपण शिक्षणाचा दबाव आणू नये. तिनं जीवनाचा आनंद लुटला पाहिजे,” असं मत आणखी एकानं व्यक्त केलं. दुसरीकडे लहान मुलीचं असं विश्लेषणात्मक उत्तर आणि त्यावर शिक्षिकेलाच अनुत्तरित करणाऱ्या प्रश्नानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video what difference does it make little girls mind blowing reason for avoiding studies resurfaces funny video srk