Viral Video Today: भारतीय संसदेत अनेकदा चित्रपटांना मागे टाकतील असे वाद, विरोध, भाषणं आपणही पाहिली असतील. पण अलीकडेच एका देशाच्या संसदेत चक्क पुरुष खासदार मंडळी गुलाबी रंगाच्या हाय हिल्स घालून आल्याचे पाहायला मिळाले. तुम्हाला धक्का बसला ना? या भन्नाट प्रकारामागचं कारण ऐकून तर तुम्ही अजून थक्क व्हाल.
संसदेत पिंक हिल्समध्ये खासदार का आले?
प्राप्त माहितीनुसार, हा प्रकार कॅनडाच्या संसदेत घडला, पुरुष खासदारांनी गुलाबी हिल्स घालून संसदेत एंट्री घेतली होती. बहुतांश वेळा गुलाबी रंग हा महिलांचा रंग म्हणून ओळखला जातो हा दृष्टिकोन बदलण्यासाठी खासदार मंडळींनी हा भन्नाट प्रकार केल्याचे समजत आहे. सोशल मेसेज पसरवण्यासाठीचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे.
कॅनडाचे परिवहन मंत्री ओमर अल्घाब्रा यांनी ट्वीट करत सांगितले की , “ओन्टारियोमधील हॅल्टन वुमेन्स प्लेसने प्रायोजित केलेल्या होप इन हील्स या कार्यक्रमाचा हा एक भाग होता. महिलांवरील हिंसाचाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी गुलाबी हिल्स घातल्या होत्या. या कृतीने स्वतःबद्दल विश्वास नसलेला पुरुषांचा गट नक्कीच दुखावला गेला असणार पण त्यातून फक्त त्यांचा नाजूक अहंकार दिसून येतो”
हे ही वाचा<< “अर्जुनला ‘या’ प्रसंगाची आठवण करून देऊ नका”, सचिन तेंडुलकरने सांगितला पहिल्या विकेटचा किस्सा
व्हिडिओ आणि संसदेतील घटनेने नेटिझन्सचे लक्ष वेधल्यानंतर, ओमर यांनी लिहिले की, “आता तुमचे लक्ष वेधून घेतल्यावर आम्ही सांगू इच्छितो की, महिलांवरील हिंसाचार केवळ शारीरिकच नाही तर सर्व प्रकारात होतो. मी माझ्यापासून सुरुवात करतो आहे , आता तुम्ही सर्व पुरुषांनी याविषयी जागरुक असणे आवश्यक आहे. आपल्या कृती आणि शब्दांचे परिणाम आणि आपल्या सभोवतालच्या स्त्रियांवर होत असतात. आपल्याला स्त्रियांना समाजात जागा निर्माण करण्यासाठी अधिक प्रोत्साहन द्यायचे आहे.”