मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला एका व्यायामशाळेत म्हणजेच जीममध्ये घुसून तिच्या पतीला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या तरुणीला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे. हा गोंधळपासून आजूबाजूचे अनेकजण अचानक काय झालं या हावभावासहीत घडणारा घटनाक्रम पाहताना व्हिडीओत दिसतंय. या महिलेने जीममध्ये असा काही गोंधळ घातलाय की आता हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
एक महिला तिच्या पतीला आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण करताना दिसतेय. भोपाळमधील कोहीफिजा परिसरामध्ये असणाऱ्या सुजा फिटनेस सेंटरमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये जी महिला मारहाण करत आहे तिचं नाव उरबा शाही असल्याची माहिती समोर येत आहे. उरबाने तिचा पती तलहा शामीमला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर ती संतापलेल्या अवस्थेत पतीला आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण करु लागते. आधी उरबा या दोघांना चप्पलेने मारहाण करते. नंतर त्यांचे केस ओढत ती त्यांच्यावर ओरडताना दिसते.
दरम्यान, बघ्यांपैकी कोणीतरी याबद्दल पोलिसांना फोन करुन माहिती कळवली. थोड्याच वेळात या ठिकाणी पोलीस दाखल होतात आणि परिस्थिती नियंत्रणात आणतात. या प्रकरणाबद्दल कोहीफिजा पोलीस स्थानकाच्या प्रमुख अधिकाऱ्याने, “नूरमहाल रोडवर राहणाऱ्या या पुरुषाच्या पत्नीने शहाजहाँनबाद पोलीस स्थानकामध्ये काही काळापूर्वी पतीविरोधात छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. पती एका दुसऱ्या महिलेसोबत फिरतो असं या तक्कारीत म्हटलं होतं. मात्र त्यावर स्पष्टीकरण देताना पतीने पत्नीने केलेले आरोप फेटाळून लावत आपण कोणत्याही मुलीसोबत फिरत नसल्याचं म्हटलं होतं,” अशी माहिती दिली.
मला माझ्या पतीवर संक्षय असल्याचं या महिलेने पोलिसांना सांगितलं. पतीच्या वागणुकीमधील बदल आणि इतर गोष्टींबद्दल संक्षय आल्याने आपण त्याचा पाठलाग करत होतो. त्याचदरम्यान आपल्याला तो त्याच्या प्रेयसीसोबत आढळून आल्याचं या महिलेने घटलेल्या प्रकरणाबद्दल बोलताना सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये महिला घटस्फोटाचा खटला सुरु असल्याचंही बोलताना दिसत आहे.
या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी दोघांवरही हाणामारीचा गुन्हा दाखल केलाय. दोन्ही बाजूच्या व्यक्तींनी एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली आहे.