Durga Puja Pandal Controversy: देशात ठिकठिकाणी नवरात्री, दुर्गा पूजा यांसाठी मंडप उभारणी सुरू आहे. रस्त्यात खोदकाम करून काही वेळेला या मंडपाचे खांब रोवले जातात, ज्यावरून अनेकदा पोलिस विरुद्ध आयोजक, कामगार असा वाद होत असतो. पण अलीकडेच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलीस दुर्गा पूजेची तयारी करत असणाऱ्या काही वृद्धांना चक्क जमिनीत खड्डा खणून तुलाच गाडून टाकेन अशी धमकी देताना पाहायला मिळत आहेत. “म्हातारपणात तू खूप हवेत उडू नकोस, इथेच जमिनीत खड्डा खणून तुला गाडून टाकेन मग तुझं डोकं थंड होईल”अशा अरेरावीच्या भाषेत वृद्धाला धमकावणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांची क्लिप तुफान व्हायरल होत आहे.

नेमका वाद काय?

माध्यमांच्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील सिद्धार्थनगर इथे हा प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही तरुणांनी पोलिसांच्या या अरेरावीचा व्हिडीओ शूट केला ज्यामुळे सदर घटना उघडकीस आली. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे ९ ऑक्टोबरला डुमारियागंजचे सीओ सुजीत कुमार राय व ग्रामस्थ यांच्यात वाद झाला होता. ज्या जमिनीवर दुर्गापूजेचा मंडप उभारण्यात येत होता त्यावरून कोर्टात खटला सुरु आहे. मागील ३० वर्षांपासून याच ठिकाणी हे ग्रामस्थ मंडप उभारतात पण सदर जमीन ग्रामपंचायतीत नोंदणीकृत आहे. आता ग्रामपंचायतीचे मुख्य सरपंच या ठिकाणी मंडप बांधण्यास परवानगी देत नव्हते व ते इतरत्र मंडप उभारण्यास सांगत होते. पण ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील हीच जमीन ओसाड आहे इतर ठिकाणी दुसऱ्यांची घरे आहेत त्यामुळे त्यांना इथेच मंडप बांधायचा आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य

ग्रामस्थ हट्टाला पेटल्यावर शेवटी पोलिसांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली. ज्यावेळेस सुजीत कुमार राय वादग्रस्त जमिनीवर पोहोचले तेव्हा ते खूपच रागात होते. त्यांनी ग्रामस्थांना लगेचच काम थांबवण्यास सांगितल्यावर एका वृद्ध व्यक्तीने त्यांना असे म्हटले की, “जाऊ द्या की १०-१५ दिवसांचाच तर प्रश्न आहे” यावरून सीओ आणखी भडकले व त्यांनी उलट सुलट उत्तरं देण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा<< २५ वर्षीय महिलेने २५ दहशतवाद्यांना संपवून गावाचा जीव वाचवला! गाझा पट्टीजवळचा थरारक घटनाक्रम, वाचा

पोलीस म्हणाले, हरीण बनवून टाकेन…

ग्रामस्थांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस म्हणाले की, “देवाच्या नावावर नाटक करू नका, जो आदेश आहे त्याचं पालन करा, नाहीतर इथेच खड्डा खणून तुम्हाला गाडून टाकेन. यांच्यावर ५ लाख रुपयांचा बॉन्ड आणि कलम १२२ लावा. आता डोकं थंड ठेव नाहीतर हरीण बनवून टाकेन. तुमच्या सात पिढ्या सुधरतील, मर्यादा सोडू नका. घर खोदून टाकेन”

Story img Loader