Viral Video Animal Fights: कधीच कोणाला कमी समजू नका कारण जर मनाशी पक्कं ठरवलं तर अगदी इवलीशी मुंगी सुद्धा बलाढ्य हत्तीला जेरीस आणू शकते. लहानपणी तुम्ही सुद्धा ही गोष्ट ऐकलीच असेल, आज आपण याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहुयात. तुम्हीच सांगा जर एका बलाढ्य सिंहांच्या चमूने झेब्र्यावर हल्ला केला तर कोण जिंकेल? अर्थात जंगलाचा राजाच, हो ना? पण या व्हिडिओमधील झेब्र्याच्या अंगात काय वीज संचारली कोण जाणे पण त्याने सिंहाच्या हल्ल्याचा डाव असा काही उलटून लावला की नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत. Animal World ने वर शेअर केलेली ही क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे.

आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की, झेब्रा थेट सिंहावर हल्ला चढवतो. एखाद्या घाबरलेल्या मांजरीप्रमाणे सिंह या हल्ल्यांनंतर सैरभैर होतो आणि मग झेब्रा त्याला अक्षरशः रडकुंडीला आणेपर्यंत पळवतो. कधी सिंह वर तर कधी झेब्रा अशा या लढाईत हे दोन्ही प्राणी मैदानात लोळण घेतात. या संपूर्ण लढाईत मैदान रणांगणासारखेच स्वरूप भासत होते.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम

Video: ११ वर्षीय चिमुकल्यावर पिटबूलचा हल्ला; चेहऱ्यावर पडले २०० टाके; अंगावर काटा आणणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

जंगलात रंगलं युद्ध

लढाईतील शक्ती व जिद्द पाहून नेटकऱ्यांनी टीम झेब्राचं तोंडभरून कौतुक केलं आहे. यावरून जंगलबुकच्या मुफासाची आठवण आली अशा कमेंट्स या व्हिडीओवर केलेल्या आहेत. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत ६०,००० व्ह्यूज व हजारो लाईक्स आहेत. कदाचित या सिंहाने आधी झेब्र्यावर हल्ला केला असावा पण व्हिडिओच्या सुरुवातीपासून झेब्राच सिंहाला भारी पडत असल्याचं दिसत आहे.

शक्यतो सिंहाच्या वाट्याला असे प्राणी जाणे टाळतात. मोठ्या समूहात असले तरी भक्षक सिंह समोर येताच हे प्राणी पळ काढतात पण या व्हिडीओच्या झेब्र्याचं ध्येय भलतंच मजबूत असल्याने त्याने थेट जंगलाच्या राजाशीच पंगा घेतला आहे.