Shocking Video: रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना नेहमी सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो. कारण कधी, कसा अपघात होईल सांगू शकत नाही. दिवसेंदिवस या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. एकपेक्षा एक भीषण अपघातांच्या घटना समोर येत असतात. असाच एक अपघात तामिळनाडूमधून समोर आला आहे. अपघाताची भीषण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. तामिळनाडूतील मदुराईमध्ये एक महिला आपल्या मुलीसोबत स्कूटरवरून जात होती. दरम्यान, रस्त्यावर कमी प्रकाशामुळे मॅनहोलचं उघडं झाकण न दिसल्यानं अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्कूटी मॅनहोलच्या झाकणाला धडकते आणि महिला अन् तिची मुलगी रस्त्यावर पडतात.या अपघातात दोघींना गंभीर दुखापत झाली आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवारी रात्री शहराच्या विलापुरम परिसराजवळील रस्त्यावर हा अपघात झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या फुटेजमध्ये रस्त्यावरून जाणारे लोक या दोन महिलांच्या मदतीसाठी येत असल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking Video: तिची चूक नसेलही, पण मृत्यूने तिला अवघ्या ७ सेकंदात कवटाळलं; उत्तर प्रदेशमधला VIDEO व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून मॅनहोलच्या झाकणांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांना कळवूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप स्थानीकांनी केलाय. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. 

@viraldaires नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.