Chennai Woman Falls From Bus: चेन्नईत सरकारी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा अगदी विचित्र पद्धतीने अपघात झाल्याचे वृत्त आहे. बसच्या तळाशी पडलेल्या छिद्रातून ही महिला खाली पडली. वल्लालार नगर ते थिरुवेरकाडू दरम्यान जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडल्याचे समजतेय. अगदी थोडक्यात तिचा जीव वाचला असला तरी बसचालक आणि वाहकाला बसच्या दुरवस्थेची माहितीच कशी नाही, असा सवालही प्रवाशांनी केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवासाच्या वेळी जेव्हा आपला स्टॉप आल्यावर ही महिला आपल्या सीटवरून उठली तेव्हा अचानक सीटच्या खालील भागात भगदाड पडले आणि त्यातून महिला खाली कोसळली. काही सेकंदातच अन्य प्रवाशांनी या महिलेला धरले आणि लगेचच बसचालकाला सतर्क केले. जर प्रवाशांनी या महिलेला धरून ठेवले नसते तर कदाचित टायर खाली येऊन ही महिला चिरडली गेली असती पण प्रवाशांच्या सावधगिरीने तिचे प्राण वाचले. बस थांबताच त्यांनी महिलेला सावधपणे पुन्हा वर सुद्धा ओढून घेतले. सध्या महिला प्रवाशावर उपचार सुरू असल्याने परिवहन अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई म्हणाले की, तामिळनाडूमध्ये द्रमुक सरकार कोणत्या स्थितीत कार्यरत आहे याचे हे उदाहरण आहे. बसची निकृष्ट देखभाल, पावसाळ्यात बसमध्ये पाणी साचून राहणे, तुटलेल्या सीट, सरकारी बसमध्ये प्रवास करणाऱ्या जनतेचा जीवही सुरक्षित नाही, परिवहन विभागाचे काम आज पूर्णपणे ठप्प झाले आहे. केवळ परिवहन विभागच नाही, तर तामिळनाडूतील प्रत्येक सरकारी विभागाची अशीच दुरवस्था झाली आहे.”

हे ही वाचा<<३७ भारतीय सैनिकांना जिवंत जाळल्याचा भीषण दावा व्हायरल; मूळ वास्तवही भयंकर, पाहा Video ची खरी बाजू

शिवाय अन्नामलाई यांनी पुढे म्हटले की, “लोकांच्या कराचा सगळा पैसा जातो कुठे, हा प्रश्न आम्हाला पडतो. परिवहन क्षेत्रात कोणत्या मार्गाने भ्रष्टाचार होऊ शकतो, याचा विचार करणाऱ्या मंत्र्यांनी सरकारी बसेसच्या देखभालीवरही लक्ष केंद्रित करायला हवे”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video woman falls from bus through hole on floor bjp leader annamalai says this is the condition of government shocking clip svs
Show comments