Accident video: कर्नाटकातून एका अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, जो तुम्हाला हादरवून सोडेल. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये भरधाव कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या महिलांना धडक दिली, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत तर त्यातील एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारचालकाने ५ महिलांना दिली धडक

ही घटना १८ ऑक्टोबर रोजी घडली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही महिला फूटपाथवरून चालताना दिसत आहेत. तेव्हा एक भरधाव कार येते आणि त्यांना जोरदार धडक देते. कारचालक फूटपाथवरून चालणाऱ्या चार महिलांना तर धडकतोच, पण पुढे वळताना तो दुसऱ्या महिलेलाही धडकतो आणि ती तशीच रस्त्यावर फरफटत जाते. धक्कादायक बाब म्हणजे एकाचवेळी ५ महिलांना धडक देऊनही कार चालक गाडी थांबवत नाही, तसाच निघून जातो. अपघाताची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळताच ते महिलांच्या मदतीसाठी धावून गेले. या धडकेत जखमी झालेली मुलगी तिच्या दोन मैत्रिणींना पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे.

एका महिलेचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, या अपघातात ४ महिला गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रुपश्री असे मृत महिलेचे नाव आहे. रूपश्री ही सुरथकल भागातील रहिवासी होती. या घटनेत जखमी झालेल्या उर्वरित ४ महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कमलेश बलदेव असे कार चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: काय गरज होती? खेकड्याने तरुणाच्या जीभेचा घेतला कडकडून चावा; परत चुकूनही नाद करणार नाही…

आरोपी स्वत: झाला सरेंडर

या घटनेनंतर कमलेशने आपली कार एका शोरूमजवळ उभी करून तेथून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. तर काही वेळाने त्याने वडिलांसोबत पोलीस ठाणे गाठून गुन्हा मान्य केला. याप्रकरणी कमलेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कमलेशला अटक केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video woman killed 4 injured as car runs over them on footpath in mangaluru srk