Shocking video: चोराच्या उलट्या बोंबा हा वाक्यप्रचार तुम्ही एकलाच असेल, याची अनेक उदाहरणेही तुम्ही आतापर्यंत पाहिली असतील. असंच आणखी एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून जातो. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात.

नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका महिलेचे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर ती चक्क विजेच्या खांबावर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला तीन मुले असून तिचे गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही बाब तिच्या पतीला समजताच त्याने विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर महिला आत्महत्येची धमकी देऊ लागली. मला नवरा आणि प्रियकरासोबत राहायचं आहे, असे म्हणत ही महिला थेट विजेच्या खांबावर चढली.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Shocking video of a Girl abuses and assualt auto driver over fare in up mirzapur video viral on social media
तुम्हीच सांगा चूक कोणाची? तरुणीने शिवीगाळ करत रिक्षाचालकाला केली मारहाण, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल

शेजारच्या गावातील एका तरुणासोबतचे महिलेचे अवैध संबंध तिच्या पतीने नाकारल्यानंतर महिलेने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. महिनाभरापूर्वी तिनं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही महिलेच्या प्रियकराने रेल्वे रुळ गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: स्मार्ट चोर! सर्वांच्या डोळ्यादेखत असा उडवला आयफोन; बँकेत खातं उघडायला आला अन् चोरी तरुन गेला

या घटनांनंतर, नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात, महिला विजेच्या खांबावर चढताना दिसली. घटनास्थळावरून एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये महिला खांबावरून खाली उतरण्यास नकार देत आहे, तर स्थानिक लोक तिला समजावून पुन्हा खाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी मध्यस्थी केली आहे. सदर महिला विद्युत खांबावर चढल्याची माहिती मिळताच पोलीस व विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महिलेला त्वरीत शांत करून खांबावरून खाली आणले. सध्या महिला सुखरूप आहे.

Story img Loader