Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा लोक प्राण्यांसह आपले फोटो व्हिडीओ शेअर करत असतात. आता प्राणी कोण? फार फार तर पाळीव प्राणी जसे की कुत्रा, मांजर, कासव.. अगदीच अति करायचं तर साप पण कोणी वाघाला पाळलेलं पाहिलं आहेत का? समजा जरी पाळलं तरी एखाद्या वाघाचा बछडा पाळण्यापर्यंत माणसाची मजल जाते तो बछडा मोठा होताच त्याला जंगलात किंवा प्राणी संग्रहालयात पाठवलं जातं. कारण एका अर्थी तेच त्यांचं घर आहे. पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या खांद्यावर घेऊन एका भल्या मोठ्या वाघाला दूध पाजत असल्याचे दिसत आहे. खरंतर हा पाळीव वाघ वाटत नाही पण कुठल्या तरीही संग्रहालयात हौशी माणसांसाठी हा अनुभव तयार केला असणार असे वाटत आहे.
तुम्ही बघू शकता की वाघाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तिथे एक माणूसही उपस्थित आहे. खाली एक महिला बसलेली आहे, इंस्टाग्राम नुसार या महिलेचे नाव @MsMena Raquel असे आहे. या महिलेच्या अकाउंटवर अनेक प्राण्यांसह खेळतानाचे व्हिडीओ आहेत. त्यातीलच हा एक अनुभव असावा. जेव्हा वाघ महिलेच्या खांद्यावर आपले पुढचे दोन पाय ठेवून उभा राहतो तेव्हा आधी ही बाई सुद्धा खूप घाबरते. मग तो बाजूला उभा असणारा वाघाचा प्रशिक्षक त्याला वाघाला शांत करून बाळाच्या बाटलीतून दूध पाजू लागतो.
दरम्यान, या व्हिडिओला तब्बल १ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर काहींनी याला मूर्खपणाचा टॅग दिला आहे. महिलेच्या इंस्टाग्रामवर तिने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले होते की, “तुम्ही एकदाच जगता आणि जर तुम्ही एकदाच मनसोक्त मज्जा केलीत तर एकच जीवन पुरेसं आहे.”
वाघ खांद्यावर चढला..
हे ही पाहा<< Photos: २० कोटींचा कुत्रा, ८०० कोटींची मांजर.. ‘या’ प्राण्यांचे फोटो पाहिले तर म्हणाल असं आयुष्य हवं!
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा!