Viral Video : आयुष्य खूप सुंदर फक्त जगता आले पाहिजे, असं तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा वाचले असेल. लहानपणी वाटतं लवकर मोठं व्हावं आणि मोठ्यापणी वाटतं पुन्हा लहान व्हावं. वय वाढत जातं आणि आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आणि मग फक्त पश्चाताप होतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिशीनंतर व्यक्तीला होणारे सर्वात मोठे दहा पश्चातापांविषयी सांगितले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे दहा पश्चाताप कोणते?

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

तिशी नंतर होणारे सर्वात मोठे १० पश्चाताप…

१. आई – बाबांबरोबर वेळ घालवला नाही!

20 वर्षाच्या वयात मित्र, करियर, डेटिंग, पार्टी… आणि नंतर कळते की माणसं कायमची नसतातच.

२. फिटनेस कडे लक्ष दिले नाही!

20 वर्षाच्या वयात रात्री वडापाव खाल्ला तरी चालायचं, पण तिशी नंतर तेच खाल्ले तर गॅस, cholesterol आणि वाढलेलं पोट.

३. मैत्री टिकवली नाही, फक्त फॉर्मेलॅटी केली!

भेटू अरे लवकरच असं म्हणता म्हणता चांगले मित्र हरवून जातात आणि राहतात ते Whatsapp status बघणारे मित्र.

४. लोक काय म्हणतील या भीतीने खूप संधी गमावल्या!

लोकांनी सांगितले म्हणून स्व:ताच्या लाइफ वर नियंत्रण नाही ठेवेल.

५. फक्त breakup, emotional आणि relationship मध्ये वेळ घालवला!

१० वेळा breakup झालं तरी बँक अकाऊंट वाढला नाही, करियर पुढे गेले नाही, फक्त दुःखच वाढले.

६. पैसे उडवले, पण गुंतवणूक केली नाही!

25 वर्षापर्यंत मजा आणि 30 वर्षापर्यंत कर्ज, मग उरलेले आयुष्य EMI फेडण्यात गेले.

७. वाचन, स्किल Development, शिक्षण घेतलं नाही!

कॉलेज संपल्यावर शिक्षण थांबवलं आणि आता AI, Automation मुळे करियर धोक्यात आले आहे.

८. फक्त नोकरीत वेळ घालवला, दुसरं काहीच केलं नाही!

साईड इन्कम, Freelancing किंवा Business करायला वेळ नव्हता… आता बॉस चा मूड ठरवतो की पगार वाढणार का नाही.

९. स्वतःचं काहीतरी करायच होतं, पण धाडस केले नाही!

अरे तो बघ, आपल्यासोबत शिकायला होता, स्वतःच काहीतरी केलंय, आणि आपण अजून संधी मिळाली की करेन असं म्हणतच राहिलो.

१०. वेळ घालवला पण वेळेचं महत्त्व समजलं नाही!

२० वर्षाच्या वयात वाटत… संपूर्ण आयुष्य पडलंय, आणि तिशी नंतर वाटत १० वर्ष कधी निघून गेली कळालंच नाही.
नंतर regret करण्यापेक्षा वेळेवर योग्य निर्णय घ्या आणि स्वतःला सिद्ध करा… कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि गेलेली वेळ परत येत नाही!

पाहा व्हायरल व्हिडीओ (watch Viral Video)

sagarpreneur05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सुरूवात करण गरजेचे आहे वय मॅटर तेव्हा असतो तुम्ही त्या वयात काय निर्णय घेत आहात…” तर एका युजरने लिहिलेय, “यातला एक पण पश्चाताप नाही झाला आम्हाला…शेवटी आपण आपला आनंद शोधायला हवा” आणखी एका युजरने लिहिलेय, “अगदी बरोबर” अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.

Story img Loader