Viral Video : सोशल मीडियावर दुचाकी चालवताना काही तरुण मंडळी वाहतूक नियम मोडताना दिसतात तर काही तरुण मंडळी अश्लील चाळे करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वाहतूक नियम मोडत दोन तरुण आणि एक तरुणी दुचाकीवरून हेल्मेट न घालता तिहेरी प्रवास करताना दिसत आहे. एवढंच नाही तर त्यांनी तिहेरी प्रवास करताना अनुचित वर्तन सुद्धा केले आहे. दुचाकीवर मागे बसलेले तरुण तरुणी भररस्त्यात अश्लील चाळे करताना या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. बंगळूरूचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
विना हेल्मेट, ट्रिपल सिट, अन् वरून दुचाकीवर अश्लील चाळे
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुण आणि एक तरुणी दुचाकीवरून तिहेरी प्रवास करताना दिसेल. विशेष म्हणजे दुचाकी चालकाने हेल्मेट सुद्धा घातलेले नाही. त्यांनी वाहतूक नियम मोडला आहे. त्यातही मागे बसलेले दोघे तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करत एकमेकांना किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ही घटना बंगळूरूच्या रागीगुड्डा बस स्टॉप ते मेट्रो स्टेशन च्या रस्त्यावर घडली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
bengaluruupdates या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून यावर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बंगळूरू पोलिसांना यावर आता कारवाई केली आहे. वाहतूक पोलीसांनी या दोन तरुणांना आणि एका तरुणीला शोधून त्यांना ४००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
जयनगर वाहतूक पोलिसांच्या मते, हा दुचाकीचाल तरुण एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, तो म्हैसूरला पळून गेला आणि त्याचा मोबाईल फोन बंद केला. आरटीओ रेकॉर्डमधून मिळालेल्या पत्त्यावरून, पोलीस पथकाने तरुणाचे घर गाठले. या तरुणाचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि त्याची आई घरकाम करते. तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली की या तरुणाच्या आईने कर्ज घेऊन त्याच्यासाठी बाईक खरेदी केली होती.