Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ दररोज पाहायला मिळतात. यात अनेक व्हिडीओ मेट्रोचेसुद्धा असतात. अनेक जण धावत्या मेट्रोत डान्स, योगा करतात; तर काही जण अनोखे स्टंट, तर अनेक जण भांडण, अश्लील कृत्ये करतानासुद्धा दिसून येतात. आजदेखील सोशल मीडियावर मेट्रोतील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तरुण एका अज्ञात व्यक्तीबरोबर भांडत असतो, तितक्यात त्यांचे भांडण सोडवायला एक आजी मध्यस्ती करताना दिसत आहे; जी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तरुण आणि एका अज्ञात व्यक्तीमध्ये जोरदार वाद होत आहे.तरुण सीटवर बसलेल्या अज्ञात प्रवाशांशी भांडताना दिसत आहे. पण, तरुणाला अडवण्यासाठी मध्ये एक आजी उभी आहे आणि त्याला ओरडताना दिसत आहे. आजी ओरडत तरुणाला मागे जाण्यास वारंवार सांगताना दिसत आहे. त्याचवेळी ती असंही म्हणतेय – ‘अरे मागे जा… काय बोलतोय तू? माझ्यापासून लांब उभा राहा आणि बोल तू मद्यपान केलं आहेस का?’ असे आजी तरुणाला बोलताना दिसत आहे. नक्की काय घडलं, कशावरून वाद सुरू झाला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…दुचाकीस्वाराची दादागिरी! अनोळखी गाडीचालकावर हल्ला; रस्त्याकडेचा नारळाचा शेंडा उचलून…पाहा थरारक घटनेचा लाईव्ह VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मेट्रोत सीटच्या मधोमध आजी आणि तरुण उभे आहेत आणि या दृश्याने मेट्रोतील सर्वच प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. तरुण समोर सीटवर बसलेल्या अज्ञात प्रवाशाशी भांडताना दिसत आहे, तर आजी त्या दोन्ही पुरुषांच्या मध्ये उभं राहून भांडणाऱ्या तरुणाचा हात धरून नातवाला ओरडतात अगदी तशाच पद्धतीत ओरडते आहे आणि ‘तू लांब राहून बोल’ असेदेखील सांगत आहे. तसेच मेट्रोत उपस्थित प्रवासी तरुणाला आणि आजीला सीटवर येऊन बसण्याचा, शांत राहण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओ @talentee_delhi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत १३ हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. व्हिडीओ पाहून भांडण सोडवणाऱ्या आजीचे कौतुक करत आहेत. तसेच एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तरुण मद्यपान करून नाटक करत आहे’, तर दुसरा युजर म्हणत आहे की, ‘आजीने योग्य केलं; तरुण घाबरला आहे’, ‘बरं झालं वृद्ध महिला त्याला ओरडली’, अशा कमेंट अनेक युजरनी व्हिडीओखाली केल्या आहेत.