Rent Boyfriend Trend : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा निर्णय असतो. कारण- लग्नासाठी जो जोडीदार तुम्ही निवडता, त्याच्याबरोबर तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचे असते. पण, लग्नाचे वय झाले की, अनेकदा आई-वडील लग्नासाठी दबाव आणतात. अशा वेळी मनाची तयारी नसतानाही अनेक तरुणी आई-वडिलांसाठी जोडीदार शोधू लागतात. अशा परिस्थितीत आता एका देशात तरुणींनी या समस्येवर एक अनोखा उपाय शोधला आहे. जगात असे काही देश आहेत की, जिथे अनेक तरुणी लग्नाचा तगादा लावणाऱ्या आई-वडिलांना खूश करण्यासाठी बॉयफ्रेंड भाड्याने घेत आहेत. होय, हे ऐकताना तुम्हाला विचित्र वाटेल; पण हे खरे आहे.

भाड्याने बॉयफ्रेंड घेण्याचा हा ट्रेंड व्हिएतनाम या देशात मोठ्या प्रमाणात वाढतोय. इथल्या अनेक तरुणी कुटुंबीय आणि नातेवाइकांना खूश करण्यासाठी, तसेच त्या लवकर लग्न करणार आहेत, असे दाखवण्यासाठी म्हणून बॉयफ्रेंड भाड्याने घेत आहेत. वाढत्या जबाबदाऱ्या, सामाजिक दबाव व करिअर यांमुळे इथल्या वयात आलेल्या अनेक तरुणी लग्नासारख्या बंधनापासून दूर पळतात. तसेच घरातील सदस्यांच्या दबावामुळे तरुणींबरोबर तरुणही जोडीदार भाड्याने घेणे पसंत करतात.

Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Devendra Fadnavis EKnath shinde ajit Pawar
VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
viral video
“आता काहीजण बोलतील हा व्हिडीओ पुण्यातला नाही!” पुणेकरांनी दिले उत्तर, पाहा VIDEO
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया

पण, जोडीदार भाड्याने घेण्यासाठी इथे काही अटीदेखील निश्चित केल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ- जोडीदाराला कुटुंबात सामील होण्यास आणि कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची इच्छा असणे आवश्यक आहे.

या संकल्पनेविषयी व्हिएतनाममधील नाम दिन्ह येथे राहणारी ३० वर्षीय मिन्ह थूने सांगितले की, लग्नासाठी तिच्यावर कुटुंबाचा खूप दबाव होता. त्यामुळे तिने बॉयफ्रेंड भाड्याने घेतला. पाच वर्षांपासून ती करिअरवर लक्ष केंद्रित करीत असल्याने तिने रिलेशनशिपमध्ये न राहण्याचा विचार केला. मात्र, काही काळानंतर तिचे पालक तिला लग्न कधी करणार, अशी विचारणा करू लागले. त्यानंतर तिने हे पाऊल उचलत, नवीन वर्षाच्या निमित्ताने भाड्याने घेतलेल्या बॉयफ्रेंडला घरी आणले.

मिन्ह थूने या भाड्याने घेतलेल्या बॉयफ्रेंडला या कामासाठी तिने व्हिएतनामी डोंग किंवा हजारो रुपये दिले. मिन्ह थू पुढे सांगते की, ‘एक दिवस तिने भाड्याच्या बॉयफ्रेंडला आई-वडिलांना हाच माझा जोडीदार आहे, असे दाखविण्यासाठी म्हणून घरी आणले. त्यावेळी त्याने तिच्या आईला स्वयंपाक करण्यास मदत केली आणि तिच्या नातेवाइकांशीही तो बोलला. खूप दिवसांनी आई-वडिलांना आनंदी पाहून तिलाही खूप आनंद झाला.

मिन्ह थूप्रमाणेच कान्ह गॉक या तरुणीलाही भाड्याने बॉयफ्रेंड घेण्याचा पर्याय योग्य वाटला. कान्ह गोक ही ३० वर्षांची वर्किंग वूमन आहे. गॉक कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हती; पण आता कुटुंबाच्या दबावामुळे तिने भाड्याने एक बॉयफ्रेंड घेतला आहे. गॉकने या बॉयफ्रेंडची त्याच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली. त्यानंतर गॉकचे आई-वडीलदेखील खूप आनंदी आहेत.

लोकांना का आवडतोय हा ट्रेंड

हा व्यवसाय व्हिएतनाममधील अनेक तरुण-तरुणींच्या समस्यांवर उपाय बनला आहे. व्हिएतनाममधील २५ वर्षीय ह्यु तुआन या तरुणाने सांगितले की, भाड्याने बॉयफ्रेंड म्हणून जाणे ही गोष्ट त्याने व्यवसाय म्हणून स्वीकारली आहे. अनेक वर्षांपासून तो हे काम करत आहे. भाड्याचा बॉयफ्रेंड बनून जाताना त्याला ग्राहकाच्या सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतात. त्याच्याकडे ग्राहक म्हणून आलेल्या तरुणींबरोबर डेटपासून कौटुंबिक कार्यांपर्यंत सर्व ठिकाणी तो जातो. त्यासाठी त्याने विशेष प्रशिक्षणही घेतले आहे. तुआनने सांगितले की, अनेक क्लायंटच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला रोज जिममध्ये जावे लागते, गाणे शिकावे लागले, स्वयंपाक शिकावा लागला, फोटो काढावे लागले आणि समोरच्या व्यक्तीला आवश्यक असलेले सर्व काही शिकून घ्यावे लागते. तो आज दोन तासांच्या कॉफी डेटसाठी किंवा शॉपिंग आउटिंगसाठी साधारणतः १,००,००० ते २,००,००० व्हिएतनामी डोंग (सुमारे $10-$20) घेतो; तर कौटुंबिक कार्यक्रमांना तरुणींसोबत जाण्यासाठी सुमारे एक दशलक्ष व्हिएतनामी डोंग घेतो.

रेल्वे रुळांच्या मधोमध झोपला, वरून गेली भरधाव ट्रेन अन् नंतर घडलं असं की…; Video पाहून व्हाल शॉक

येथील लोकांचे मत आहे की, हे जोखमीचे आणि तात्पुरते काम आहे; ज्यामुळे भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक कुटुंबांतील सदस्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात आणि कुटुंबातील सदस्यांचाही तुमच्यावरील विश्वास उडू शकतो. त्याशिवाय व्हिएतनाममध्ये बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड भाड्याने घेणे हा ट्रेंड कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित नाही. विशेषतः महिलांना यात अधिक काळजी घ्यावी लागते.

भाड्याने बॉयफ्रेंडच्या ट्रेंडमध्ये सोशल मीडियाने विशेष भूमिका बजावली आहे. कारण- सोशल मीडियावर असे अनेक गट आहेत, जिथे तरुणी भाड्याने बॉयफ्रेंड मिळविण्याबाबत सर्च करू शकतात आणि त्यांना कामावर ठेवू शकतात. त्यामुळे विशेषत: महिलांमध्येच हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

यावर एका युजरने लिहिले की, करिअरशिवाय लग्न केल्याने अनेक समस्या येतात, भाड्याने जोडीदार घेणे दोघांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे तुमच्या पालकांना आनंद होतो आणि ते तुमच्यावर दबाव आणत नाहीत. दुसऱ्या युजरने लिहिले की, हे सगळं खोटं आहे हे कळल्यावर पालकांना किती दुःख झालं असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.’

बॉयफ्रेंड भाड्याने घेण्याचा हा ट्रेंड केवळ व्हिएतनामपुरता मर्यादित नाही. चीनमध्ये लग्नाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. इथेही लोकांना सणासुदीच्या वेळी बॉयफ्रेंड भाड्याने घेणे पसंत करतात.

Story img Loader