दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील पहिल्या महिला रिक्षाचलक सुनीता चौधरी यांना तीस हजार रूपयाला लुबाडले होते. त्याची राज्य मंत्री विजय गोयल यांनी आर्थिक मदत केली आहे. विजय गोयल यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. प्रत्येक महिन्याला गरजू लोकांना खासदाराच्या पगारातून मदत करणार असल्याचेही गोयल यांनी सांगितलं.
आपल्या ट्विटमध्ये गोयल म्हणतात…’आज सकाळी दिल्लीमधील पहिल्या महिला रिक्षा चालक सुनीता चौधरी यांची ३० हजार रूपयांची कमाई लुटली गेली. बातमी वाचून मन सुन्न झालं. माझ्या खासदाराच्या पगारीमधून सुनीता यांना ३० हजारांची मदत केली.’
आज सवेरे मीडिया में दिल्ली की पहली महिला ऑटो रिक्शा ड्राइवर सुनीता चौधरी की जीवनभर की जमापूंजी 30,000 रूपए लूटने की खबर से मन भावुक हुआ और मैंने अपनी सांसद सैलरी से 30,000 रुपए देकर छोटी-सी सहायता करने की पहल की। pic.twitter.com/pKqusL3bk9
— Vijay Goel (@VijayGoelBJP) June 6, 2019
यापूढेही खासदारांच्या पगारीतून गरजू लोकांना आणि सामाजिक कार्यांसाठी मदत करणार आहे. कोणालाही मदत केल्यानंतर आत्मसंतुष्टी मिळते, असे अन्य एका ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले आहे.
मैंने तय किया है कि हर महीने मैं अपनी सांसद की सैलरी को जरूरतमंदों व सामाजिक कार्यों में लगाऊंगा। किसी को भी ऐसे मदद करके एक आत्मसंतुष्टि की प्राप्ति होती है।
— Vijay Goel (@VijayGoelBJP) June 6, 2019
दरम्यान, मंगळवारी दिल्लीमधील ४० वर्षीय महिला रिक्षा चालक सुनीता चौधरी यांना सहकारी रिक्षा चालकानंच लुटलं होतं. मोहन नगरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. सुनीताकडील ३० हजार रूपये घेऊन रिक्षा चालक पसार झाला. सुनीता चौधी यांनी साहिबाबद पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तात्काळ तक्रार दाखल केली आहे. सुनीता चौधरी मूळची मेरठची आहे. गेल्या १५ वर्षांपासून दिल्लीच्या खिडकी एक्सटेंशन मालवीय नगरमध्ये राहते. मंगळवारी सुनीता मेरठवरून दिल्लीला पोहचली. मंगळवारी सकाळी दहा वाजता मोहन नगरमधून सनीता रिक्षामध्ये बसली. सुनीता जवळ दोन बॅग होत्या. त्या रिक्षामध्ये मागे ठेवण्यात आल्या. रिक्षा सुरू झाल्यानंतर काहीवेळातच चालकासोबत एक आणि मागे दोन प्रवासी बसले.
मोहन नगरच्या फ्लायओव्हरवर पोलिसांमुळे समोर बसलेल्या तरूणाला चालकानं मागे बसवले. वसुंधरा लाल बत्तीजवळ रिक्षा बंद पडल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी दुसरा रिक्षा घेण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी चालकानं रिक्षा सुरू केली आणि पसार झाला. सुनीताच्या बॅगमध्ये ३० हजार रूपये होते.
सीओ डॉक्टर राकेश मिश्र यांच्यानुसार, सुनीता रिक्षाची वाट पाहत होती. त्यावेळीच आरोपी रिक्षा चालू करून पसार झाला. रिक्षांमधील सुनीताच्या बॅगमध्ये तीस हजार रूपयांची रक्कम होती. सुनीतानं बसमध्ये बसून रिक्षाचा पाठलाग केला मात्र, रिक्षा पसार झाला होता. त्यानंतर सुनीतानं साहिबाबद पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली.