Vijayadashami Dussehra 2023 Wishes in Marathi: आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४४ वाजता सुरू होणार आहे, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१४ वाजता समाप्त होईल. यंदा दसरा हा सण २४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. पौराणिक कथांनुसार या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचावध तर दुर्गामातेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता. उद्यादिवशी आपणही आपल्यातील वाईट सवयी व गुणांना मागे टाकून येत्या काळात जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा व विजयी व्हावे अशी शिकवण हा दसऱ्याचा सण देतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदू धर्मातील साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना देताना Whatsapp Status, Instagram Story, Facebook वर शेअर करण्यासाठी मराठी शुभेच्छापत्र आम्ही तयार केली आहेत. खाली दिलेल्या HD Images, Status Post आपण मोफत डाउनलोड करून शेअर करू शकता.

दसऱ्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा

सोन्यासारख्या मित्रपरिवाराला दसऱ्याच्या सुवर्ण शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

देवी दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
आणि तुम्हाला चांगले आरोग्य, यश आणि आनंद देवो
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

उद्या दसरा साजरा करतानाचे तुमचे खास फोटो तुम्हाला लोकसत्ताच्या पेजवर झळकताना पाहायचे असतील तर लोकउत्सव या कॅटेगरीमधील नवरात्री २०२३ टॅबवर क्लिक करून खाली दिलेल्या फोटो अपलोड पर्यायावर जाऊन फोटो नक्की शेअर करा. लवकरच बेस्ट तीन फोटो निवडून एक आकर्षक बक्षीस सुद्धा देणार आहे त्यामुळे विसरू नका, आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!