Desi Jugaad For Crab Fishing : पावसाळी हंगाम सुरु असतानाच मासेमारीचे जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. गावाकडचे मासे दिसले की, नॉन व्हेज खाणाऱ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. समुद्रातील माशांपेक्षा नदीतील गोड्या पाण्यातील माशांना जास्त चव असते, असं काही लोक म्हणतात. पण अशातच जर का चिंबोऱ्या खाण्याची तलप आली, तर बाजारात कानाकोपऱ्यात जाऊन चिंबोऱ्या शोधाव्या लागतात. कारण चिंबोऱ्या सहजासहजी बाजारात उपलब्ध नसतात. कारण त्यांना पकडणे तितकं सोपं नसतं. पण गावाकडच्या एका तरुणाने देशी जुगाड करून पाण्याच्या तळाशी लपलेल्या शेकडो चिंबोऱ्या पकडल्या आहेत.या तरुणाचं मासेमारीचं टॅलेंट पाहून सर्वच थक्क झाले आहेत. चिंबोऱ्या पकडण्यासाठी केलेल्या भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

@manish_patil3931 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चिंबोऱ्यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की, एका मुलाने तळागाळात लपलेल्या चिंबोऱ्या पकडण्यासाठी एक छोटी जाळी तयार केली आहे. त्या जाळीला चिंबोरीला खाण्यासाठी एक खाद्यपदार्थ अडकवलेलं आहे. छोट्या रिंगला जाळी बसवून मध्ये एक दोरी लावण्यात आलीय आणि त्याच दोरीला चिंबोरीला फसवण्यासाटी खाद्यपदार्थ लावण्यात आलंय. पाण्यात गेल्यावर तो मुलगा ती जाळी फेकतो आणि काही सेकंदातच पाण्यात असलेली चिंबोरी त्या जाळ्यात अडकते. एक एक करुन त्या तरुणाने पिशवीभर चिंबोऱ्या पकडल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत झाडे दिसतात ना? पण एक स्री सुद्धा लपलीय, एकदा क्लिक करून बघा

चिंबोऱ्या कशा पकडायच्या? इथे पाहा व्हिडीओ

मासेमारी करण्याचं टॅलेंटही सर्वांकडे नसतं. कोळी लोक मासेमारीचे वेगवेगळे प्रयोग करून समुद्रातील मोठे मासे पकडतात. पण गावाकडचे तरुणही त्यांच्या बुद्धीच्या जोरावर नदीतील मासे पकडतात. अशातच चिंबोऱ्या पकडण्यासाठी जुगाडच करावा लागतो. कारण हाताने चिंबोरी पकडायला गेल्यावर चिंबोऱ्या धारदार फांगड्याने चावा घेण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताच यूजर्सने भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.