Viral Video : सोशल मीडियावर अनेक गावाकडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून गावाकडची आठवण येते. गावाकडची माणसं, त्यांचे साधे राहणीमान डोळ्यासमोर येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडची आजी चुलीवर भाकर बनवताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या गावाकडची आठवण येऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्ली अनेक जण नोकरी आणि शिक्षणामुळे शहराकडे जाताना दिसत आहे. त्यामुळे गावातील अनेक लोकांना इच्छा नसतानाही गाव सोडावे लागते पण शहरात राहताना सुद्धा अनेकदा यांना गावाकडची आठवण येते. गावाकडची लोकं आठवतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुद्धा तुमचे गाव आठवेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजी दिसेल जी चुलीवर भाकरी बनवताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हीही भारावून जाल. ही आजी परातीत सुरुवातीला भाकरी थापताना दिसते आणि त्यानंतर ही भाकरी चुलीवर ठेवलेल्या तव्यावर भाजताना दिसते. या आजीच्या आजुबाजूला अनेक महिला दिसताहेत ज्या स्वयंपाक करताहेत. कदाचित हा व्हिडीओ एखाद्या सार्वजानिक कार्यक्रमातील स्वयंपाकघरातील आहे. गावाकडे निसर्गाच्या वातावरणात चुलीवर स्वयंपाक बनवला जातो. व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की गावाकडची माणसं प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना दिसतात. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपल्या कामात आनंद शोधता आला पाहिजे, चुलीवरची भाकर”

चुलीवरची भाकर ही अनेकांना आवडते. गाव खेड्यात चुलीवर स्वयंपाक केला जातो. त्यात चुलीवरच्या जेवणाची चव अप्रतिम वाटते. शहरातील लोकांना चुलीवरच्या जेवण खूप आवडते. त्यात चुलीवरची भाकर अधिक लोकप्रिय आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या आजीच्या हातची चुलीवरची भाकर खायची इच्छा होईल. काही लोकांना गावच्या जेवणाची आठवण येईल. चुलीवरची भाकरीच चव कुठेही मिळू शकत नाही. या व्हिडीओवर “जीना इसी का नाम है” हे लोकप्रिय गीत लावले आहे
ek_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावाकडची माणसं”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Village life people in villages enjoy every moment and live fully their life video viral of old lady making bhakri on chula ndj