Beautiful Village Video : गावाकडे आजही लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांवर जसा जीव लावतात, तसाच जीव आपल्या गाई-बैल, बकऱ्या, शेळ्या, मेढ्यांवर लावतात. त्यांना ही जनावरं आपल्या पोटच्या लेकराइतकी प्यारी असतात. जनावरांना थंडी, वारा, पावसापासून काही होऊ नये यासाठी काळजी घेतात. यात सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे; त्यामुळे शेतकरी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेताना दिसतातय. अशाचप्रकारे एका मावशीनेही आपल्या शेळ्या पावसात भिजू नये म्हणून त्यांची विशेष काळजी घेतलीय. या मावशीने आपल्या सर्व शेळ्यांसाठी चक्क रेनकोट्स शिवलेत. रेनकोट घालून शेळ्यांना रानात चरायला सोडले जाते. सध्या सोशल मीडियावर या रोनकोट घातलेल्या शेळ्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
मावशीचा शेळ्यांवर लेकरासारखा जीव
प्राणी मुके असल्याने ते बोलू शकत नाही, पण त्यांनाही भावना असतात. त्यांनाही ऊन, वारा, पाऊस यामुळे त्रास होत असतो. हाच त्रास मावशीने ओळखला आणि पावसात भिजत रानात चरण्यासाठी जाणाऱ्या शेळ्यांसाठी चक्क प्लास्टिकच्या गोण्यांपासून रेनकोट शिवले. हे रेनकोट शेळ्यांना घालूून ती रानात चरायला घेऊन जाते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मुसळधार पाऊस कोसळतोय. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारसमोर शेळ्यांचा कळप येत असतो, यातील प्रत्येक शेळ्यांना प्लास्टिकच्या गोण्यांचे रेनकोट घातलेले दिसतेय. यावेळी कारमधील चालक त्या मावशींना उत्सुकतेपोटी विचारतो, मावशी शेळ्यांना रोनकोट शिवलेत का? ज्यावर त्या मावशीदेखील हसून हो असे उत्तर देतात. गावाकडील हे दृश्य पाहताना खरंच खूप आनंद मिळतो, कारण अशी साधी भोळी आणि प्राण्यांवर प्रेम व्यक्त करणारी माणसं फक्त गावातच पाहायला मिळतात.
गावाकडील सुंदर व्हिडीओ (Beautiful Village Life)
गावाकडील हा सुंदर व्हिडीओ @marathi_epic_jokes नावाच्या पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो नेटिझन्सनाही खूप आवडलाय. अनेकांनी या व्हिडीओखाली भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी मावशीने जनावरांप्रती दाखवलेल्या काळजीचे कौतुक केलेय.
More Stories On Trending : भयानक! महाकाय अजगराला खांद्यावर घेत तरुण बाथरुममध्ये करतोय अंघोळ; Video पाहून तुम्हीही व्हाल शॉक
“गरीब असूनही सर्वात श्रीमंत आहेत या ताई” युजर्सच्या कमेंट्स
एका युजरने लिहिले की, मावशीने अगदी आपल्या लेकरांसारखी आपल्या शेळ्यांची त्यांच्या पिल्लांची काळजी घेतली आहे. मुसळधार पावसात त्यांना चरायला न्यावं लागतं, पण पावसात त्यांचेसुद्धा खूप हाल होतात हे ओळखून काळजी घेतलीय. खूप छान. दुसऱ्या युजरने लिहिले की, याला म्हणतात साधेपणा आणि माणुसकी. तिसऱ्या युजरने लिहिले की, साधी भोळी माणसं फक्त गावाकडे पाहायला मिळतात, कोणालाही जीव लावणारी. चौथ्या युजरने लिहिले की, गरीब असूनही सर्वात श्रीमंत आहेत या ताई… अशाप्रकारे काहींनी खूप छान, सुंदर, भारी व्हिडीओ आहे, अशा कमेंट्स केल्या आहेत.