गुजरातमधल्या दाहोद जिल्ह्यात दरवर्षी येथील आदिवासी अनोख्या पद्धतीने पाडवा साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी गाय – बैलांची पूजा केली जाते त्यानंतर येथील आदिवासी हे जमीनीवर झोपतात. या प्रत्येकाच्या अंगावरुन गाय बैल धावत जातात. दिवाळी पाडव्याला गुजरातच्या गरबदा गावात ‘गाय गोहरी’ हा सण साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी गावातील गायी बैलांना सजवले जाते. त्यांना रंगीबेरंगी झूल पांघरली जाते. मोरांच्या पंखांनी त्यांना आणखी आकर्षक बनवले जाते त्यानंतर गावाचे प्रमुख पूजेचे आयोजन करतात. गायी बैलांची पूजा करून झाल्यानंतर सारे आदिवसी एका रस्त्यावर लोटांगण घालतात. त्यांच्या अंगावरून गुरे धावत जातात. हा जीवघेणा प्रकार करण्याची परंपरा इथे शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. प्राण्यांवर केलेल्या अत्याचाराचे प्रायश्चित म्हणून येथे हा सण साजरा केला जातो. हजारो संख्येने आदिवासी या सणांत सहभागी होतात. प्राण्यांनी जरी आजच्या दिवशी आपल्याला पायदळी तुडवले तरी कोणतीही ईजा होत नाही अशी यांची मान्यता आहे. त्यामुळे कोणतीही भिती मनात न बाळगता ते या सणांत सहभागी होतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा