Viral Video : सोशल मीडियावर खेडेगावातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ग्रामीण राहणीमान, तेथील संस्कृती, कार्यक्रम, प्रथा अन् परंपरा सांगणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. हे व्हिडीओ पाहून गावाकडची संस्कृतीचे दर्शन घडते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावची यात्रा दिसत आहे. या यात्रेमध्ये गावकरी पारंपारीक नृत्य सादर करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

गावकऱ्यांनी केले पारंपारिक नृत्य

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला गावातील उत्सव दिसून येईल. या व्हिडीओमध्ये जत्रा भरलेली दिसत आहे. या जत्रेमध्ये गावकरी दंग झाले आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गावकरी हळद उधळून लेझिम नृत्य सादर करताना दिसत आहेत. हे गावकरी पूर्णपणे नृत्याचा आनंद घेताना दिसत आहे. अन्य गावकरी त्यांचे हे नृत्य आवडीने पाहताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या गावाची आठवण येईल तर काही लोकांना गावाकडचे दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video: ‘देव तारी त्याला कोण मारी’, भरधाव कारनं मुलीला उडवलं; १० फूट हवेत फेकली गेली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

पाहा व्हायरल व्हिडीओ

nikhil_talapchaiwala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त आनंद घेता आला पाहिजे”

हेही वाचा : “वेळ बदलते आणि कर्तव्य पण बदलतात” थकलेल्या वडिलांचा लेक बनला आधार; पक्षांचा ‘हा’ VIDEO विचार करायला भाग पाडेल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फक्त लेझिम पाहिजे होते तेवढेच कमी नाहीतर लेझिम डान्स एकदम सुंदर अप्रतिम आहे” तर एका युजरने लिहिलेय, “बघा खेडे गावच्या जत्रा किती छान नाहीतर शहरांमध्ये धांगडधिंगा..छोट्याशा जाग्यांमध्ये तालावर ठेका धरून किती छान डान्स चाललाय. याला म्हणतात भारताची संस्कृती. फेटेवाले आजोबा तर फारच छान खेळतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “७५ ते 80 वर्ष वय असणारा वृद्ध व्यक्ती अजून.लेझिम खेळतात.आणि ह्यालाच तर म्हणतात शरीर .थकले पण मन अजून तरुण आहे किती जोश आहे पहा” एक युजर लिहितो, “ही जुनी माणसं आहेत तोपर्यंतच आपल्याला पाहायला मिळणार हा खेळ”