माणूस हा अजबच प्राणी आहे, आपण आपल्या राहण्यासाठी जंगलं नष्ट केली, त्यांच्या हद्दीत घुसून या प्राण्यांना बेघर केले, त्यांचा विनाश केला. पण हेच प्राणी जेव्हा भुक भागवण्यासाठी आपल्या हद्दीत, खेड्यात, शेतात घुसू लागले तेव्हा आपण काय केले? तर अमानुषपणे त्यांचा बळी घेतला. आजही चुकून माकून अन्नाच्या शोधात एखादा जंगली प्राणी गावच्या वेशीत शिरला की त्याला भोकसून, ठेचून मारले जाते. गेल्या कित्येक दिवसांत अशा घटना घडल्या आहे. एखादा बिबट्या गावात आला की काठ्यांनी, दगड्यांनी ठेचून त्यांची कत्तल केली जाते. पण गुजरात मधल्या अमरेली मधल्या गावक-यांनी धाडस करून एका सिंहिणीचे प्राण वाचवले आणि अजूनही भूतदया शिल्लक आहे हे दाखवून दिले.

VIDEO: या अजगराच्या त्वचेवर खरोखरच ‘स्माईली’ आहेत

Viral Video : माझ्या आईला कोणी परत आणेल का?

VIRAL VIDEO: आपल्या जखमी आईबरोबर ते पिल्लू  बसून राहिलं

अमरेलीमध्ये एका ५० फूट खोल असलेल्या विहिरीत सिंहिण पडली होती. तेव्हा गावक-यांनी खाटच्या साहाय्याने या सिंहिणीला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर वनाधिका-यांनी या सिंहिणीला पिंज-यात पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. गावक-यांनी प्रसंगावधानता दाखवून खाटेच्या साहाय्याने तिला बाहेर काढले अन्यथा तिचा जीव गेला असता. अमरेली गीर अभयारण्याच्या अगदी जवळ आहे. अनेकदा या गावांत सिंह मुक्तपणे संचार करताना गावक-यांनी पाहिले आहे. रात्रीच नाही तर भरदिवसाही खाण्याच्या शोधात सिंह आजूबाजूच्या गावात शिरतात. गेल्याच आठवड्यात या ठिकाणी भरदिवसा तीन सिंहांना एका गावक-याने पाहिले होते याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

Story img Loader