वन्य प्राणी आणि माणसांमधला संघर्ष आपल्याला काही नवीन नाही. जशी जशी मानवी वस्ती वाढत जात आहे तसे आपण या वन्य प्राण्यांच्या क्षेत्रात आणखीनच शिरत आहोत. मुंबईसारख्या महानगरात नॅशनल पार्कजवळच्या सोसायट्यांमध्ये बिबट्यांचा वावर अनेक वेळा दिसून येतो. नॅशनल पार्कमध्ये आधीपासून असलेले आदिवासी पाड्यातले आदिवासीही आपला अंधार झाला की  त्यांच्या घराची दारं,खिडक्या लावून आतच राहतात. कोकणातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटकमधून आलेले रानटी हत्ती तिथल्या शेतकऱ्यांची पिकं नष्ट करतात. कधी कधी शेतकऱ्यांवर ही हल्ला करतात. देशात अनेक ठिकाणी अशा घटना सातत्याने होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशा घटनांमध्ये गावकऱ्यांची भूमिका शक्यतो त्या रानटी जनावरांला ठार करण्याचीच असते. पण हिमाचल प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. तिथल्या स्पिती व्हॅलीमधल्या किब्बर या गावात ही घटना घडली आहे.

हिमालयामध्ये ‘स्नो लेपर्ड’ म्हणजेच बर्फात आढळणारा बिबट्या आढळतो. तिथल्या डोंगरांच्या कडेकपारीत राहणारे हे बिबटे लहान प्राण्यांची शिकार करतात. अनेकदा ते भागातल्या गावकऱ्यांनी पाळलेल्या शेळ्यामेंढ्यांवर हल्ला चढवत त्यांची शिकार करतात. त्यामुळे गावकरी या बिबट्यांना घाबरून असतात. तसंच ते त्यांच्या पाळीव प्राण्यांचंही रक्षण करताना या बिबट्यांना पळवून लावायला मागेपुढे पाहत नाहीत.

पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मात्र एक विलक्षण घटना घडली. किब्बर गावाजवळ एक स्नो लेपर्ड आल्याने गावकरी सावध झाले. पण हा बिबट्या अतिशय वाईट परिस्थितीत असल्याचे या गावकऱ्यांना जाणवलं. या बिबट्याची हालचाल अतिशय मंदपणे होत होती. तो बिबट्या आजारी होता. आणि आजारपणामुळे त्याला शिकार न करता आल्याने तो खंगला होता.

खंगलेला स्नो लेपर्ड (छाया सौजन्य- टाॅपयॅप्स)

गावकऱ्यांच्या शेळ्यामेंढ्यांना फस्त करणाऱ्या या बिबट्याला या गावकऱ्यांनी ठार केलं असतं तरी ते त्यांच्यासाठी काहीसं योग्य ठरलं असतं. पण या आजारी बिबट्याची किब्बर गावच्या या गावकऱ्यांनी मदत केली. या गावकऱ्यांनी त्यांच्या काही शेळ्या मेंढ्या कापून त्यांचं मांस या बिबट्याला खायला दिलं. तो ज्याठिकाणी बसून असायचा त्या ठिकामी हे गावकरी पाणीही नेऊन ठेवायचे. असं कितीतरी दिवस चाललं. या दिवसात या बिबट्याने या गावकऱ्यांवर किंवा त्यांच्या शेळ्या-मेढ्यांवर अजिबात हल्ला केला नाही.

पण या बिबट्याची प्रकृती फारच बिघडली होती. आणि गावकऱ्यांनी त्याला अन्नपाण्याची मदत करूनही शेवटी हा बिबट्या मरण पावला.

हा विषय तिथेच संपला असता. पण इतके दिवस या बिबट्याची काळजी घेत असणाऱ्या गावकऱ्यांना त्याचा लळा लागला होता आणि तो मरण पावल्यावर सगळं गाव हळहळलं.

या गावकऱ्यांनी या बिबट्याला एखाद्या माणसाप्रमामे अंत्यसंस्कार करून शेवटचा निरोप दिला!

गावकऱ्यांनी सन्मानाने या बिबट्याला निरोप दिला (छाया सौजन्य- टाॅपयॅप्स)

निसर्गाच्या कुशीत, दऱ्याखोऱ्यात, जंगलझाडीत राहणारी लोकं तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेले असतात. तिथल्या कठीण परिस्थितीशी दोन हात करत, जीव मुठीत धरून या लोकांना राहावं लागत असलं तरी किब्बर गावातल्यासारखी एखादी घटना समोर येते आणि त्यावेळी मानवाचा निसर्गाशी असलेला एकोपा ठळकपणे समोर येतो.