सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिला तर लोकांना नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या एका छोट्या व्हॅनला अपघात झाला, या अपघातातून चालक थोडक्यात बचावला. अपघातानंतर चालकाच्या मदतीसाठी आजूबाजूचे काही लोक धावून आले, पण जेव्हा या लोकांना व्हॅनमधून रस्त्यावर सांडलेले दारूचे बॉक्स दिसले तेव्हा लोकांनी चालकाला तिथेच सोडलं आणि दारूच्या बाटल्या घेऊन तिथून पळ काढला. तेलंगणातील वेमूलापल्ली गावात हा प्रकार घडला.
एक व्हॅन चालक दारूच्या बाटल्या घेऊन हुजूर नगरला जात होता. पण वाटेत गुरं आडवी आली त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची गाडी उलटली. या अपघातात त्याला किरकोळ जखमा झाल्या. त्याला वाचवण्यासाठी गावकरी धावून आले, चालकाला त्यांनी मदतही केली. पण जेव्हा व्हॅनमधून दारूच्या बाटल्या खाली पडलेल्या गावकऱ्यांनी पाहिल्या तेव्हा चालकाला तिथेच सोडून गावकरी दारूच्या बाटल्या घेऊन पसार झाले. रस्त्यावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं. पोलिसांनी ‘द हिंदू’ला दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकारामुळे चालकाला ५० हजारांचा फटका बसला आहे. गाडीतील ३५० बिअर बॉक्समधल्या काही बाटल्या फुटल्या तर शेकडो बाटल्या गावकऱ्यांनी पळवून नेल्यात.
It's party time.
Van with load of beer bottles turned turtle near Shankarpally village Nalgonda #Telangana, many locals grabbed bottles, ran pic.twitter.com/12KPfxVGsb— kavitha Rao (@iamKavithaRao) September 1, 2017