कधीकधी वन्य प्राणी अशा परिस्थितीत अडकतात की त्यांना माणसांच्या मदतीची आवश्यकता भासते. इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात लोक जीव धोक्यात घालून मोठ्या प्राण्यांना वाचवताना दिसत आहेत.ट्विटरवर बिबट्याच्या बचावाचा व्हिडिओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये, खोल विहिरीत पडलेल्या आणि अडकलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी ग्रामस्थ सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. हा बिबट्याच्या रेस्क्यूचा खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंस्टाग्राम युजर सहाना सिंगने शेअर केलेल्या या व्हिडीओ कर्नाटकातील असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गावकरी घाबरलेल्या बिबट्याला बाहेर पडण्यासाठी विहिरीच्या आत पेटलेलं लाकूड टाकताना दिसत आहेत.गावकरी या बिबट्यासाठी विहरीत शिडीसुद्धा टाकतात, मात्र तरीही बिबट्या बाहेर येत नाही. यावेळी गावकरी पेटत लाकूड त्याला दाखवतात, यावेळी बिबट्या घाबरून विहरीबाहेर येतो आणि पळून जातो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – हा चमत्कार झाला कसा? चक्क तुळस नाचू लागली! Video पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
हा व्हिडीओ आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्याला भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या बिबट्याच्या बचावासाठी नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे मात्र काहींनी बचावासाठी वापरलेल्या पद्धतीबद्दल टिका केली आहे. या आगीत बिबट्या गंभीर जखमी झाला असावा, असे काहींना वाटत आहे.