Viral video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. त्यात अजगर म्हंटलं की भितीने थरकापच उडतो. कारण हा महाकाय अजगर क्षणात कुणालाही गिळून टाकू शकतो. त्यांच्या तावडीत एकदा का कोणी आला तर विषयच संपला. ते कधीच आपल्या शिकाराला जीव वाचवण्याची दुसरी संधी देत नाहीत. अशाच एका अजगराने नवजात बाळाला गिळल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका हरणाच्या पिल्लाला या अजगराने संपूर्ण गिळून टाकलंय. व्हिडीओ बघून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा महाकाय सरपटणारा प्राणी आपली शिकार जिवंत गिळतो, तो आधी आपल्या शिकाराला घट्ट विळखा घालतो, ज्यामुळे शिकाराला हलता देखील येत नाही, ज्यानंतर तो आपलं मोठं तोंड खोलून शिकाराला गिळतो.या व्हायरल व्हिडीओमध्ये अजगराने एका हरणाला जिवंत गिळले आहे. ते ही अनेक लोकांच्यासमोर, या घटनेचा व्हिडीओ तेथील लोकांनी शुट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा गावकऱ्यांनी कसं बाहेर काढलं

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अजगराने हळूहळू करुन हरणाला आपल्या पोटात कसे ढकलले आहे. नवजात पिल्लाला असं पाहून जमलेल्या सर्वांचाच जीव वरखाली होत आहे. काहीवेळाने गावकरी सर्पमित्राला बोलवतात, सर्पमित्र अजगराला पकडतो आणि हरणाला त्याच्या तोंडातून बाहेर कढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर अजगर स्वत:च हरणाला बाहेर काढतो, मात्र तोपर्यंत हरणाचा मृत्यू झालेला असतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पैशाचं बंडल दिसलं, नियत फिरली अन्…चक्क अजगरानं केली चोरी; VIDEO पाहून व्हाल थक्क

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ murliwalehausla24 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.