ज्यांच्या मैत्रीनं एकेकाळी मैदान मारलेलं ती जोडी म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जोडी मैदानात असली की भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. दोघेही रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात नावलौकीक मिळवत गेला. तर विनोद कांबळी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत राहिला. पण दोघांची नाळ ही क्रिकेट आणि आचरेकर सरांच्या शिकवणीशी जुळून होती. नुकताच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा एका कार्यक्रमातील भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून ‘अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये’ असं नेटकरी म्हणत आहेत. विनोद कांबळी-सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.
३ डिसेंबर रोजी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी विनोद कांबळीही आले होते, विनोद कांबळी आज ५२ वर्षांचे आहेत. मात्र त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती पूर्णपणे फीट नसल्याचं म्हटलं जातं. तर झालं असं की, सचिन व्यासपीठावर चढताच त्याची पहिली नजर पडली ती आपल्या मित्राकडे. सचिनने क्षणाचाही विलंब न लावता विनोदकडे गेला आणि त्याची विचारपूस केली. विनोद कांबळीने सचिनचा हात हातात घेऊन घट्ट धरुन ठेवला
एक भक्कम पार्टनरशिप केल्याचं भास करून दिला.आचरेकर सरांच्या स्मारकाच्या अनावरणानिमित्ताने हे दोन्ही जुने मित्र एका व्यासपीठावर आले होते. यावेळी विनोद सचिनचा हात सोडायला तयार नव्हता आणि त्याला तिथेच थांबण्यासाठी सांगत होता. व्हिडीओ नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, विनोद कांबळी सचिनला मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र शारीरिक स्थिती व्यवस्थित नसल्यानं त्याला उठताही येत नव्हतं. हेच दृश्य पाहन नेटकरी भावूक झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?
नेटकरी भावूक, प्रतिक्रियांचा पाऊस
नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “सचिन आणि विनोद यांची मैत्री अजूनही चांगली अभेद्य आहे” तर आणखी एकानं मित्र असावा तर श्री कृष्ण आणि सुदामा सारखी जीवनात असा एक सच्चा मित्र असावा असं म्हंटलंय. एकानं सचिनच्या कृतीवर “सचिन तर मारू शकला असताना मिठी विनोद कांबळीला” असं म्हंटलंय. आणखी एकानं, “या दूनियेमध्ये माणसे आपल्याशी हात मिळवत नसतात ,किंवा आपल्याला मिठी मारत नसतात .तर आपल्या वेळेशी,आपल्या समाजातील स्टेटसशी हात मिळवत असतात. कारण आज पैसा नाही तर इज्जत नाही.पैसा असेल तर परकेच काय अख्खं जग आपले असते .नाही तर आपलेही जवळ येत नाही .हे कटू सत्य आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.