गर्लफ्रेंड कुणाची यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. भररस्त्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

या हाणामारीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

(हे ही वाचा: नादखुळा..!! ७१ हजारांच्या स्कूटीसाठी विकत घेतला १५.४ लाखांचा VIP नंबर, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण)

(हे ही वाचा: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल! देसी जुगाड बघून नेटीझन्स झाले आश्चर्यचकीत)

नक्की काय झालं?

भानू कोरी या तरुणाचे एका तरुणाशी प्रेम संबंध होते.मात्र काही दिवसांपासून ती त्याला सोडून शाकीब खान नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. याच कारणावरून भानू कोरी याने शाकीबला फोन करून नेताजी चौकात बोलवले मात्र भानू सोबत आधीपासून त्याचे मित्र असल्याची कुणकुण शाकीबला लागली आणि शाकिबनेही त्याचे तीन मित्र बोलावून घेतले. त्याठिकाणी दोन्ही गट एकमेकांसमोर येताच तुंबळ हाणामारी झाली आणि भररस्त्यात झालेली ही हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Story img Loader