देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांचे एक विधान सध्या खूप चर्चेत आहे. देशाची प्रगती करायची असेल तर तरुणांनी दररोज सुमारे १२ तास काम केल पाहिजे. म्हणजे आठवड्यातून एकूण ७० तास तरी काम केले पाहिजे. तरच भारत गेल्या दोन ते तीन दशकांमध्ये यश मिळवणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करु शकेल, असे विधान नारायण मूर्ती यांनी केले होते. मात्र यामुळे ते सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत. ‘द रेकॉर्ड’ या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले होते.
नारायण मूर्ती यांच्या विधानावर सुरु असलेल्या चर्चांमध्ये आता कॉमेडियन वीर दास यानेही उडी घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी आता खूप व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने नारायण मूर्ती यांची फिरकी घेतली आहे. इतकेच नाही तर त्यांचे जावई आणि इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याविषयी देखील लिहिले आहे.
वीर दास याने पोस्टमध्ये काय लिहिले आहे?
वीर दास याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आयुष्य खूप कठीण आहे. तुम्ही एका मुलीला भेटता, तुम्ही प्रेमात पडता, लग्न करता आणि मुलीच्या वडिलांची इच्छा आहे की, तुम्ही आठवड्यातून ७० तास काम करावे. जर तुम्हाला एवढी मेहनत करता येत नसते आणि मजा करायची असते म्हणून तर तुम्ही इंग्लंडला निघून जाता.
दुसऱ्या एका पोस्टमध्येही वीर दासने खिल्ली उडवत लिहिले की, जर तुम्ही आठवड्यातील ५ दिवस ७० तास काम करत असाल, यासाठी तुम्ही सकाळी ९ निघता ते रात्री ते ११ वाजेपर्यंत घरी पोहोचता. तुम्हाला १२.३० पर्यंत घरी यावे लागते आणि सकाळी ७.३० पर्यंत तुम्ही पुन्हा ऑफिससाठी निघावे लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या बॉसच्या ऑफिसमध्ये फार्ट करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. पण तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला साथीदाराबरोबर जवळीक साधण्यासाठीही वेळ हवा आहे.
‘…मग इन्फोसिसमध्ये सहभागी होण्याची गरज नाही’
वीर दास याच्याप्रमाणेच इतर लोकही मीम्स आणि पोस्टच्या माध्यमातून नारायण मूर्ती यांच्या विधानाचा विरोध करत आहेत. एका यूजरने उपहासात्मकपणे लिहिले की, नारायण मूर्ती बरोबर आहेत, जर लोक कॉलेजपासूनच आठवड्यातून ७० तास काम करत असतील तर त्यांच्या कंपनीला इन्फोसिसमध्ये जाण्याची गरज नाही.
‘3 तासांचा प्रवासही जोडा सर’
आणखी एका यूजरने लिहिले की, या विधानामुळे नारायण मूर्ती नोकरी आणि घर दोन्ही सांभाळणाऱ्या महिलांचे जीवन इतके कठीण बनेल की त्या नोकरी सोडतील. तिसऱ्या एका यूजरने लिहिले की, तुमच नवलं आहे. आपल्या देशात १२ तासांव्यतिरिक्त ३ तासांचा प्रवासही जोडा.