Mother got epileptic seizure in pool son saved : एका दहा वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावरील मंडळींचं मन जिंकत आहे. आईचा जीव वाचवण्यासाठी मुलाने न डगमगता स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. प्रत्यक्षात एक महिला स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत असताना तिला अचानक मिरगीचा झटका आला. यादरम्यान महिलेच्या दहा वर्षांच्या मुलाने स्विमिंग पूलमध्ये उडी मारून आईचा जीव वाचवला.

ही घटना महिलेच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये मुलगा स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना दिसत आहे. स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करणाऱ्या एका महिलेला अचानक मिरगीचा झटका आला. हे या मुलाने पाहिलं आणि मागेपुढे न पाहता या १० वर्षांच्या मुलाने स्विमिंग पूलमध्ये उडी घेतली. त्याच्या आईला त्याने किनाऱ्यावर आणलं. एक कुत्रा देखील शिडीवर थांबलेला दिसतो. व्हिडीओच्या शेवटी एक व्यक्ती पळत पळत त्यांच्याजवळ पोहोचल्याचे दिसून येते.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
Little boy funny video after he was fail in exam I was in tension due to failure, but my friend also failed
शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका

आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या बैलाने चांगलंच तुडवलं, पाहा हा VIRAL VIDEO

६ ऑगस्ट रोजी लॉरी कीन नावाच्या महिलेने फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, तिच्या मुलाचे नाव गेविन आहे आणि ती आपल्या मुलाला वाचवल्याबद्दल आभारी असल्याचं लिहिलं आहे. कीनीने या घटनेचा रेकॉर्ड केलेला व्हिडीओही पोस्टसोबत शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘Kaala Chashma’ गाण्याचं आतापर्यंतचं हे बेस्ट वर्जन! व्हॉलीबॉल कोर्टमध्ये मुलींच्या डान्सने लावले वेड

पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले, “तुमचा मुलगा तुमच्यासाठी देवदूत ठरला आहे. किती अद्भुत आहे. तो खरा हिरो आहे.” दुसरा म्हणाला, “देव तुला आशीर्वाद देवो गेविन. तू आईसाठी देवदूत ठरला आहेस!!! आई, तू ठीक आहेस याचा मला आनंद आहे!!! अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.

आणखी वाचा : अ‍ॅमेझॉनचे शेकडो पॅकेज रेल्वे प्लॅटफॉर्मवर फेकून देऊ लागले, हा VIRAL VIDEO एकदा पाहा!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जेव्हा बिल गेट्स यांनी इंटरनेटबद्दल सांगितलं तेव्हा सारेच जण हसले होते….हा जुना VIRAL VIDEO एकदा पाहाच!

एबीसी न्यूजनुसार ही घटना अमेरिकेतील ओक्लाहोमामध्ये घडली आहे. कीने एबीसीला सांगितले की आई आणि मुलाची जोडी स्विमिंग पूलमध्ये पोहत होती. पुढे त्या म्हणाल्या, “गेविन काही काळ पूलबाहेर होता आणि त्यात मला झटका आला. पण माझ्या मुलाने मला वाचवले. एबीसी न्यूजनुसार, पूलच्या काठावर उभ्या असलेल्या गेविनला मोठा आवाज ऐकू आला आणि त्याने त्याची आई पूलमध्ये बुडताना पाहिली. आजोबा काही करण्याआधीच त्याने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली, आईला शिडीवरून वर आणले आणि तिचे डोके एका मिनिटापेक्षा जास्त काळ पाण्यावर धरले. “मी थोडा घाबरलो होतो,” असं गेविन म्हणाला. १० वर्षीय मुलाला त्याच्या शौर्याबद्दल किंग्स्टन पोलिस विभागाकडून पुरस्कारही मिळाला आहे.

Story img Loader