Trending News: छोटे कुटुंब सुखी कुटुंब हे लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी आजवर अनेक स्तरावरून प्रयत्न झाले. पण अलीकडे तरुणाई स्वतःहूनच मिनी फॅमिलीकडे वळत आहे. त्यामुळे येत्या काळात लोकसंख्या नियंत्रणाला मदत होईल अशी चिन्ह आहेत. पण अर्थात आता व्हायरल होणाऱ्या या माणसाप्रमाणे जर सगळ्यांनी विचार केला तर मात्र पुरती पंचाईत होऊन बसेल. प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानी ५० वर्षीय व्यक्तीच्या घरात अलीकडेच ६० व्या बाळाचा जन्म झाला आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेलच पण आता पुढे वाचाल तर.. केट्टा येथील सरदार हाजी जान मोहम्मद यांनी चक्क १०० मुलांचे वडील होण्याचा निर्णय घेतला आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानच्या बलुचिस्तानची प्रांतीय राजधानी क्वेटा येथे हे कुटुंब राहत असून सरदार जानला तीन बायका आहेत, एकाहून अधिक स्त्रियांशी लग्न करणे ही आपल्या कुटुंबात सामान्य गोष्ट आहे असे त्याने सांगितले. त्याला ५९ मुले अगोदरच होती आणि अलीकडेच त्यांनी आपल्या ६० व्या बाळाचे कुटुंबात स्वागत केले आहे. एवढ्यावरच हा इसम थांबला नसून आणखी बाळांच्या जन्मासाठी नव्या बायकोचा सुद्धा शोध घेत असल्याचं समजत आहे.

सरदार हाजी जानने बीबीसीला सांगितले, “मी माझ्या सर्व मित्रांना माझ्या चौथ्या लग्नासाठी पत्नी शोधण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे. मला नवीन बाळं हवी आहेत शक्यतो मुलांपेक्षा जास्त मुली. माझं सगळं कुटुंब एकत्र असावं अशीही माझी इच्छा आहे. आतापर्यंत जन्मलेल्या ६० बाळांपैकी ५ जणांचे निधन झाले असून ५५ जिवंत आहेत काहीजण चांगले काम सुद्धा करतात.

६० मुलांचा बाप, स्वतःचं वय ५०

हे ही वाचा<< Video: बसमध्ये महिलेसमोर दाखवत होता प्रायव्हेट पार्ट; नंतर स्वतःच रडून सांगू लागला, “मी इथे…”

आतापर्यंत या ५० वर्षीय जानने तुमचाही जीव हादरवून सोडला असेल हो ना? आता पुढे वाचा ही व्यक्ती चक्क एक डॉक्टर असून त्याच्या निवासस्थानी स्वतःचा एक दवाखाना आहे. दरम्यान या मुलाखतीत बीबीसीने त्याला ६० बाळांची नावं लक्षात राहतात का असे विचारले असता त्याने असून होकार दिला आणि आपल्या नव्या ६० व्या बाळाचे नाव खुशहाल खान असल्याचे सुद्धा घोषित केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral 50 year old pakistani man welcomes his 60th child with 3 wives wants 100 more children shocking tweet svs