एकीचे बळ काय असते, हे लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत. लहानपणी तुम्ही कथा ऐकली असेल. असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टीम वर्कचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. टीम वर्कच्या मदतीने अशक्य कामही शक्य करणं सोपं होतं याची शिकवण या व्हायरल व्हिडीओमधून मिळते.
साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा… या ओळी हिंदी चित्रपटात गायल्या असतील पण त्याचा अर्थ अगदी अचूक आहे. म्हणजेच एकमेकांना आधार देऊन प्रत्येक कामात दोन माणसे जरी सहभागी झाली तरी काम सोपं होतं असं नाही तर जे शक्य होत नाही तेही करून दाखवता येतं. एकत्र काम करणे ही देखील यशाची गुरुकिल्ली मानली जाते. जे एका व्हिडीओद्वारे सिद्ध झाले. या व्हिडीओमध्ये टीमवर्कचा एक अद्भुत पराक्रम पाहायला मिळाला.
या व्हिडीओमध्ये काही पुरूष उंच भिंत चढण्याचा प्रयत्न करतात. पण सुरूवातीला इतकी उंच भिंत हे पुरूष कसे चढणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण जस जसा हा व्हिडीओ पुढे जातो तसं तसं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तरही सापडतं. हे सहा पुरूष एक एक करून एकमेकांना आधार देत ही उंच भिंत सहज चढण्यात यशस्वी होतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. इतकी उंच भिंत चढण्यासाठी या पुरूषांनी ना कोणती शिडी वापरली ना कोणती उंच वस्तू. यासाठी त्यांनी टीम वर्कचा फॉर्म्यूला वापरला ज्याचं महत्त्व हे प्रत्येक क्षेत्रात असतं.
आणखी वाचा : भांडता भांडता एस्केलेटरवरून पडले तरीही लाथा-बुक्क्या सुरूच! पाहा हा मजेदार VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! महिला वेटरने एकाच वेळी हातात १२ बियर मग पकडून आणले!
हा व्हिडीओ @TansuYegen च्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे आवर्जून आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करू लागले आहेत. एकत्र काम केल्याने फक्त मोठ्या अडचणींवर सहज मात करता येत नाही तर काम कमीत कमी वेळेत काम पूर्ण करता येते हा धडा शिकवण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा आहे. अशा प्रकारे काम तर सोपे होतेच पण माणसावरचा भारही कमी होतो.
सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला. या प्रेरणादायी व्हिडीओतून अनेकांना धडाही मिळेल आणि फायदाही होईल. एकत्र काम करण्याची मजाही वेगळी आहे. कामाच्या ओझ्यामुळे तसेच काम करताना एकटेपणामुळे येणारा कंटाळा यामुळे एकटा माणूस लवकर थकतो. अशा वेळी दुसरा कोणी सोबत असेल तर उत्साहही राहतो आणि ऊर्जाही राहते. यामुळेच सर्वांनी या व्हिडीओचे मनापासून कौतुक केले. वास्तविक जीवनात टीम वर्क स्वीकारणे चांगली कल्पना असू शकते. हे एकदा करून बघा.