सोशल मीडियाच्या जगात वावरताना अनेकांना आपले सुंदर फोटो शेअर करण्याची सवय असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी करण्याकडे कल दिसून आला आहे. मात्र या कॉस्मेटिक सर्जरीचे काही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. असंच काहीसं बुल्गारियात राहणाऱ्या एंड्रिया हिच्यासोबत झालं आहे. एंड्रियाने आपल्या ओठांचा आकार वाढवण्यासाठी २७ इंजेक्शन घेतले. आता जगातील सर्वात मोठे ओठ असल्याचा दावा एंड्रियाने केला आहे. स्वत:ला बार्बी डॉल संबोधणाऱ्या एंड्रियाने आतापर्यंत जवळपास ५ लाख रुपये खर्च केला आहेत. मात्र अजूनही तिचं समाधान झालेलं नाही. अजून मोठे ओठ करून तिला विश्वविक्रम प्रस्थापित करायचा आहे. त्याचबरोबर तिला आपल्या चेहऱ्याची लांबी देखील वाढवायची आहे.

प्लास्टिक बार्बी डॉलसारखं दिसण्याचं एंड्रियाचं स्वप्न आहे. यासाठी ती प्लास्टिक सर्जरी करण्यासही तयार आहे. ओठ मोठे झाल्याने तिचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर फॉलोवर्सची संख्याही वाढली आहे.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
The incident took place in Gaur City 2
मुलांच्या भांडणात पडली महिला, चिमुकल्यासह आईच्याही मारली कानाखाली, Video Viral
Loksatta kutuhal Artificial intelligence helps during COVID
कुतूहल: कोविडकाळात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत
Buying momentum from foreign investors print eco news
परकीय गुंतवणूकदारांकडून खरेदीला पुन्हा जोम; वर्षसांगतेला बाजाराला ‘सांता’तेजीची झळाळी शक्य

एंड्रियाने आतापर्यंत २७ इंजेक्शन फक्त ओठांवर घेतले आहेत. यात एका इंजेक्शनची किंमत जवळपास २० हजार रुपये आहे. एंड्रियाचा फोटो पाहून अनेकांनी तिला सर्जरी न करण्याचा सल्ला देखील दिला आहे. मात्र स्वत:च्या प्रेमात असलेल्या एंड्रियाला याचं काही देणंघेणं नाही.

Story img Loader