तुम्ही अनेकदा आ बैल मुझे मार ही प्रसिद्ध हिंदी म्हण ऐकली असेल. जेव्हा कोणी स्वत:हून संकटांना आमंत्रण देतं तेव्हा ही म्हण ऐकवली जाते. ही म्हण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील तरुणाला लागू होत आहे. हा तरुण स्वत;हूनचं एका संकटाला आमंत्रण देतो आणि त्यात फसतो. व्हायरल व्हिडीओमध्ये म्हशींचा कळप समोरून चालताना दिसत आहे, यावेळी एक तरुण स्केटिंग करत कळपातील एका म्हशीला जाऊन जोरात धडकतो ज्यानंतर जे काही होते ते पाहून तुम्हालाही हसू आवरणे अवघड होईल. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रस्त्यावर आरामात स्केटबोर्ड चालवताना दिसत आहे. मोकळ्या रस्त्यावर स्केटबोर्डवर उभं राहून हा तरुण वाकडा तिकडा होत स्केटिंगचा आनंद घेत असतो. पण यावेळी अचानक त्यासमोर म्हशींचा एक कळप येतो. यानंतर जे होते त्याचा विचार त्या तरुणानेही कधी केला नसेल.
म्हशींचा कळप रस्त्याने चालू लागला की पूर्ण रस्त्या त्या व्यापून टाकतात. म्हशी अगदी रमत गमत आरामात, मागे, पुढे न पाहत चालत राहतात. मागू किंवा समोरुन कोण येतयं याच्याशी त्यांना काहीही पडलेली नसते. यावेळी अचानक तिच्यासमोर एखादा व्यक्ती जर आला तर त्याची काय अवस्था होऊ शकते हे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल.
व्हिडीओतील तरुण स्केटबोर्डवर उभा राहून म्हशींच्या कळपाच्या दिशेने वेगात पुढे जात असतो. अशावेळी स्केटबोर्डही तो पटकन थांबवू शकत नाही. यावेळी तो म्हशींच्या कळपातून वाट काढण्याचा प्रयत्न करतो. पण अचानक एक म्हैस हिंसक होऊन त्या तरुणाच्या दिशेने मुसंडी मारते आणि डोक्याने तरुणाला पाठीवर घेत जोरात खाली आदळते. म्हशीच्या या धडकेत तरुण थेट जाऊन रस्त्याच्या एका बाजूला पडतो. क्षणभर असे वाटते की हा तरुण म्हशीच्या कळपातून वाट काढत पटकन निघून जाईल पण तसे काही होत नाही.
या व्हिडीओला आत्तापर्यंत ४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने सांगितले की, बिचारी म्हैस घाबरली. तर दुसऱ्या एका युजरने सांगितले की, तरुणाने हेल्मेट आणि हातमोजे घालून स्टेटबोर्डिंग करायला हवी होती.