Funny Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते, जे पाहून लोकांना आनंद होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून हसून तुमचं पोट दुखेल एवढ हसाल. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा मजेशीर पद्धतीने मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना दिसत आहे. मुलगा जमिनीवर झोपून व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचे तुम्ही पाहू शकता.

मजेशीर व्हिडीओ

व्हिडीओ कोणत्यातरी कार्यक्रमाचा आहे असे दिसते. अनेक मुलं कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामध्ये डान्स परफॉर्मन्स देताना दिसतात. अनेक जण ग्रुपमध्ये नाचतानाही दिसतात. दरम्यान, लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो हातात मोबाईल घेऊन. लहान मुल हातात मोबाईल घेऊन डान्स करत असलेल्या लोकांचा व्हिडीओ बनवताना दिसत आहे. पण हा मुलगा अतिशय मजेशीर पद्धतीने व्हिडीओ बनवताना दिसत आहे.

(हे ही वाचा: अवघ्या ५०रुपयांत ‘हे’ वृद्ध जोडपं खाऊ घालतंय पोटभर जेवण; Viral Video बघून नेटकरी झालेत फॅन)

व्हिडीओमध्ये, कधी मुलगा जमिनीवर पडून तर कधी बसून व्हिडीओ बनवत आहे. यादरम्यान तो कंबर हलवतमटकतानाही दिसत आहे. हा मुलगा अशा मजेशीर पद्धतीने व्हिडीओ बनवताना दिसतो की, नाचणाऱ्या लोकांचेही लक्ष त्याच्याकडे जाते. यानंतर तो मुलाकडे पाहून सगळेच हसायला लागतात. त्याच वेळी, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत मुलगा त्याच्या कामात व्यस्त असलेला दिसतो. लोक त्याच्यावर हसतात याची त्याला पर्वा नाही हे दिसून येते. व्हिडीओच्या शेवटी एक व्यक्ती मुलाच्या हातातून मोबाईल घेत असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर व्हिडिओ संपतो.

(हे ही वाचा: डेव्हॉन कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये पारंपारिक कपडे घालून थिरकली CSK ची टीम; व्हिडीओ होतोय viral)

(हे ही वाचा: Viral Video: फिटनेसवालं लग्न! वधू-वरांनी स्टेजवरच पुश-अप्स करायला केली सुरुवात)

नेटीझन्सच्या पसंतीस उतरतोय व्हिडीओ

हा व्हिडीओ be_harami नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करण्यासोबतच ‘हेवी कॅमेरामन’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ इतका फनी आहे की तो खूप वेगाने पाहिला आणि शेअर केला जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळ जवळ ९५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

Story img Loader