सध्या सोशल मीडियावर एक अतिशय किळसवाना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस एका कुत्र्याला विनाकारण दुचाकीला बांधून फरपटत घेऊन जाताना दिसत आहे. या व्यक्तीच्या कृत्याचा अनेकांनी निषेध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गाझियाबादमधील विजयनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रताप विहार चौकीच्या परिसरात घडली आहे. एका व्यक्तीने मोपेडच्या मागे बांधलेल्या कुत्र्याला रस्त्यावरुन फरपटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेशी संबंधित आणखी व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये काही लोकांनी त्या व्यक्तीला जोरजोरात आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहेत, पण तो व्यक्ती न थांबता तसाच सुसाट वेगाने बाईक पळवता राहतो.
दरम्यान, काही लोकांनी आपली वाहने मोपेडसमोर आडवी लावली आणि त्या व्यक्तीला थांबवलं. या व्हिडीओतील दृश्य विचलित करणारी आहेत, कारण . या व्यक्तीने कुत्र्याचे दोन्ही पाय गाडीला बांधलेले होते शिवाय रस्त्यावरुन ओढत आणल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याचंही दिसत आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच ते तत्काळ घटनास्थळी आले आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि कुत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
हेही पाहा- Video: हातात बंदूक घेऊन फोटो शेअर करणं तरुणाला पडलं महागात; आता स्वत:च्या पायावर उभंही राहता येईना
रविवारी दुपारी विजय नगर पोलिस स्टेशन हद्दीत प्रताप विहार चौकी परिसरात एका दुचाकीला दोरीने बांधलेल्या कुत्र्याला एक माणूस ओढत होता. ही घटना तेथील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यामध्ये अनेकांनी दुचाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबला नसल्याचं दिसत आहे. तर कुत्र्याचे दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते शिवाय कुत्रा खूप मोठ्याने ओरडत होता तरीही त्याने गाडी थांबवली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या व्यक्तीने कुत्र्याला सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याचंही लोकांनी सांगितलं. दरम्यान, काही लोकांनी त्याला असं का केलं ? विचारलं असता त्याने काही ठोस उत्तर दिलं नाही. काही लोकांनी प्राणीप्रेमी संघटनेच्या सदस्यांना घटनास्थळी बोलावलं आणि त्यानंतर कुत्र्याला विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तीला लोकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अटक केली.