बंधनात राहायला कुणालाच आवडत नाही, मात्र मनुष्य प्राण्याला असं वाटत तो सर्वात शक्तिशाली प्राणी आहे आणी म्हणूनत तो प्राण्यांना स्वत:च्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना पिंजऱ्यात कैद ठेवले जाते. अेरिकेतील एका चिंपांझीसोबतही असेच केले गेले. या चिंपांझीला तब्बल २९ वर्ष बमध्ये कोंडून ठेवले होते. नुकतेच त्याला बाहेर काढण्यात आले असून त्यानं पहिल्यांदा बाहेरचे जग पाहिले. दरम्यान तो जेव्हा पहिल्यांदाच आकाश पाहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव हे कॅमेरात कैद झाले आहेत. आणि आता या चिंपांझीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हॅनिला नावाच्या या मादी चिंपांझीला न्यूयॉर्कमधील प्रयोगशाळेत २ वर्षांसाठी ठेवण्यात आले होते. यानंतर त्याला कॅलिफोर्नियातील प्रयोगशाळेत बंद ठेवण्यात आले. त्याला या प्रयोगशाळेत २९ वर्षे कोंडून ठेवले होते. पण गेल्या वर्षीच व्हॅनिलासह इतर काही चिंपांझींना फ्लोरिडातील सेव्ह द चिंप्स अभयारण्यात आणण्यात आले होते. येथे त्याला प्रथमच मोकळे वातावरण मिळाले आणि निसर्गाच्या सान्निध्याची संधी मिळाली. यावेळी पहिल्यांदा आकाश पाहिल्यावर तो बघतच राहिला.
२९ वर्षानंतर चिंपांझीने पाहिलं विस्तीर्ण आकाश
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सुरुवातीला तो दारात थांबतो, जणू तो बाहेर यायला घाबरतो, पण जेव्हा दुसरा चिंपांझी त्याचे स्वागत करतो तेव्हा तो आनंदाने बाहेर येतो आणि त्याला मिठी मारतो. मग तो आकाशाकडे अतिशय काळजीपूर्वक पाहू लागतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – मैत्रीला वय नसतं, अंतराचं बंधन नसतं! जुन्या शाळकरी मित्रांच्या भेटीचा भावनिक Video व्हायरल
जेव्हा व्हॅनिलाने पहिल्यांदा आकाश पाहिलं तेव्हा तो भावूक आणि खूप उत्साही असल्याचं स्पष्ट दिसत आहे.ज्यामध्ये व्हॅनिला आश्चर्याने आकाशाकडे पाहत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतर अनेक अकाउंटवरून व्हायरल होत आहे. संस्थेचे डॉक्टर अँड्र्यू हॅलोरन सांगतात की, कॅलिफोर्नियामध्ये ज्या बंदिस्त ठिकाणी चिंपांझी राहत होते तेथे गवतही नव्हते.