लहान मुलांचा निसर्गाच्या विविध गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन जितका वेगळा असतो, तितकीच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा सुंदर असतात. जेव्हा ते पहिल्यांदा काहीतरी नवीन पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर गोंडस हावभाव पाहून अनेकजण त्यांच्या प्रेमात पडतात. लहान बाळाला अनेक गोष्टी पहिल्यांदाच पाहताना तुम्ही कधी पाहिलंय का? आज आम्ही तुम्हाला एका १४ महिन्याच्या बाळाचा एक खास व्हिडीओ दाखवणार आहोत, जो आयुष्यात पहिल्यांदा कुत्रा पाहिल्यावर आश्चर्यचकित झाला. बाळाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘मॅड्यूसमाईल’ या ट्विटर अकाऊंटवरून हा गोंडस व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान बाळ दिसत आहे, जो फक्त १ वर्ष आणि २ महिन्यांचा आहे. रस्त्याच्या कडेला उभा असलेलं हे बाळ पहिल्यांदा एका कुत्र्याला पाहतो त्यावेळी तो आश्चर्यचकित होतो आणि अचानक अचानक उड्या मारायला लागतो. जणू काही तो प्राण्याला पाहून खूप आनंदीत होतो. “जेव्हा १४ महिन्यांच्या मुलाने पहिल्यांदा कुत्रा पाहिला” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
या व्हिडीओमध्ये दिसणारा कुत्रा सुद्धा खूप केसाळ आहे. पण बाळ त्याच्या जवळ जायला घाबरत नाही. उलट तो खूप उत्तेजित होतो आणि कुत्र्यासारखा चक्कर मारायला लागतो. कुत्र्याला पाहून तो जमिनीवर आडवा होतो आणि कुत्रा त्याला चाटायला येताच तो लगेच उभा राहतो. पण तरीही कुत्र्यापासून दूर पळत नाही.
आणखी वाचा : VIRAL : याला म्हणतात नशीब! रातोरात करोडपती झाला अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर…२७० रूपयाच्या लॉटरीनं पालटलं नशीब
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : प्रेम असावं तर असं…! कोंबडीला घेऊन जाणाऱ्या माणसासोबतच भिडला कोंबडा! पुढे काय झालं ते पाहाच…
या व्हिडीओला ७० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५०० हून अधिक लोकांनी ते रिट्विट केलं आहे. लोक व्हिडीओवर कमेंट करून आपली प्रतिक्रियाही देत आहेत. एका महिलेने लिहिलं की, “बाळ कुत्र्याशी किती प्रेमाने वागत आहे, सहसा लहान मुले प्राण्यांना खूप त्रास देतात.” व्हिडीओ पाहिल्यानंतर मन पिघळून गेल्याचं देखील काही युजर्स सांगत आहेत. एका व्यक्तीने तर हा व्हिडीओ वारंवार पाहूनही पोट भरत नसल्याचं सांगितलं आहे.