Viral video: पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. काहीजण समुद्र किनारी जातात, बोटींगचा आनंद घेतात. अशावेळी सांगूही पर्यटक एकत नाहीत. काही वेळेला समुद्राला भरती आलेली असते, तरीही पर्यटक नसतं धाडस करतात, आणि हेच धाडस त्यांचा अंगाशी येतं. असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका छोट्या बोटीत ८ ते १० पर्यटक बसले आहेत. ते हळू हळू समुद्रात जातात. यावेळी समुद्राला भरती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाटा उसळताना दिसत आहेत. या लाटांचा जोर इतका आहे की, बोटही हलत आहे. पर्यटक मात्र या सगळ्याचा आनंद घेण्यात व्यस्थ दिसत आहेत. मात्र त्यांचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पुढच्याच क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि संपूर्ण पाणी बोटीत जाऊन बोट उलटी होते. सर्व पर्यटकही बोटीसोबत बुडू लागतात. यामध्ये पर्यटकांच्या किंचाळण्याचा आवाज येत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – महिलांच्या तुलनेत पुरुषांना आयुष्य कमी का? ‘हा’ व्हायरल Video पाहून मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर
हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.